fujiya khan ex minister | Sarkarnama

मोदींच्या काळात महिला सक्षमीकरण बजेट खालावले- फौजिया खान

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 9 मार्च 2018

औरंगाबाद : केंद्रातील युपीए सरकारच्या काळात महिलांच्या सक्षमीकरणाचे बजेट तीनवरून सहा टक्‍यांपर्यंत वाढवण्यात आले होते. मात्र मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर यात वाढ होण्याऐवजी घट झाली. त्यामुळे बेटी बचाओ, बेटी पढाव ही केवळ घोषणाच ठरत असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान यांनी केला. 

जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादीच्या वतीने औरंगाबादेत "स्त्री जागर' परिषदेचे आयोजन करण्यात आले. तत्पुर्वी पत्रकार परिषदेत फौजिया खान यांनी युपीए व मोदी सरकारच्या महिला सक्षमीकरण धोरणांची तुलना करत मोदी सरकारवर टिका केली. 

युपीए सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी बजेटमध्ये विशेष तरतूद करत होते. त्यात सातत्याने वाढ देखील केली जायची. मात्र, मोदी सरकार आल्यापासून या बजेटला कात्री लावण्यात आल्याचा दावा फौजिया खान यांनी केला. महिलांच्या सक्षमीकरणासाठी दहा टक्‍यांपर्यत आर्थिक तरतूद करण्याची मागणी देखील त्यांनी केली. 

संबंधित लेख