fuel hike bharat band ashok chavan pc | Sarkarnama

शिवसेना सत्तेसाठी लाचार; बरे झाले बंदमध्ये सहभागी झाली नाही, अशोक चव्हाणांची टीका 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

मुंबई : इंधनाचे दर आकाशाला भिडले आहेत. केंद्रातील मोदी सरकार सर्वस्तरावर अपयशी ठरले आहे अशी टीका करतानाच शिवसेना सत्तेसाठी लाचार असल्याने ती आजच्या बंदमध्ये सहभागी झाली नसल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केली. 

इंधन दरवाढीविरोधात विरोधी पक्षांनी पुकारलेल्या बंदला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल चव्हाण यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी भाजप आणि कॉंग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, की महागाईमुळे समाजात संतापाची लाट आहे. आजच्या बंद दरम्यान कोठेही हिंसक घटना घडली नाही याचे समाधान आहे. शेकाप, मनसे, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे, डावे आदी पक्षांनी बंदमध्ये सहभागी होऊन सरकारचा निषेध केला आहे. 

इंधनाचे दर कमी करण्याचे आमच्या हातात नाही असे केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद म्हणतात याकडे लक्ष वेधत चव्हाण म्हणाले, की सरकारने जर ठरविले इंधनाचे दर कमी होऊ शकतात. भाजपने निवडणुकीपूर्वी जी आश्‍वासने दिली होती त्याचे काय झाले? मोदी सरकार सामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यात अपयशी ठरले आहे. तसेच शिवसेना आजच्य बंदमध्ये सहभागी झाली नाही ते बरेच झाले. कारण शिवसेनेचा चेहरा त्यानिमित्त जनतेसमोर पुढे आला आहे. शिवसेना ही सत्तेसाठी लाचार आहे. 

संबंधित लेख