मी जो कोणी आहे तो मित्रांमुळेच : केशव उपाध्ये 

आज फ्रेंडशिप डे सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. मैत्रीचा ओलावा राजकारणातही जपणारे अनेक नेते आणि कार्यकर्तेही असतात. अगदी भिन्न विचारसरणीचे किंवा टोकाचे मतभेद असतानाही ही मैत्री जपली अशी अनेक उदाहरणेआहेत. फेंडशिप डे निमित्तकाही नेत्यांनी मित्रांच्या आठवणींना दिलेला उजाळा
मी जो कोणी आहे तो मित्रांमुळेच : केशव उपाध्ये 

आज फेंडशिप डे. हा दिवस माझ्यासाठी पवित्र तर आहेच. पण, माझ्यासाठी खास ही आहे. याच दिवशी नव्हे तर नेहमीच आठवण होते ती माझ्या चार मित्रांची. आम्ही पाच पांडवच म्हणा हवं तर ! खरे तर या जिवश्‍चकंठश्‍च मित्रामुळे मी घडलो त्यांच्यामुळेच आज इथपर्यंत पोचलो. या चारही जणांचा मी ऋणी आहे. जीवनाच्या वाटेवर त्यांचा आधार किती मोठा होता याची जाणीव मला आहे असे सांगत भाजपचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आपल्या मैत्रीला उजाळा दिला. 

"सरकारनामा'शी बोलताना केशव उपाध्ये हे काही क्षण भूतकाळात रमले. जुन्या मित्रांच्या आठवणी त्यांनी कथन केल्या. ते म्हणाले, "" खरंतर मी मूळचा सोलापूरचा. महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेतला. नवे मित्र, नवे वातावरण होते. मी "अभाविप'चे काम सुरू केले होते. त्यावेळी मला चारजण भेटले. अंशमत पानसे, रवींद्र कुळकर्णी, डॉ. आनंद काटीकर, श्रीधर खेडगीकर आणि मी पाचवा. 

"अभाविप'चे काम सुरू असताना आम्हा पाचजणांचं घट्ट नात तयार होत गेलं. परिषदेच्या बैठका तर नित्याच्याच. या बैठकांमध्ये आमचे अगदी टोकाचे मतभेद होत असतं. एकमेकाची मतं पटत नसतं. आरोपप्रत्यारोप होत असे. पण, बैठक संपली की आम्ही पुन्हा एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून अगा काही घडलेच नाही या भावनेतून पुन्हा एकत्र येत असू. हास्यकल्लोळात बुडून जात असे. 

वॉल पेंटिंग करणे हा तर आमचा छंदच. परिषदेचे जे काही काम असेल ते इमानेइतबारे करीत राहणे. शिवाय अभ्यास हे सर्वच आलेच. सोलापूर एसटी स्टॅंडवर पहाटे चारपाच पर्यंत गप्पा मारणे हे तर नित्याचेच. या गप्पांना नेहमीच चहाची साथही मिळत असे. खरेतर आमचे विषय वेगळे होते. मी कॉमर्स, दुसरा आयटी, तिसरा लॉ, चौथा फार्मसी आणि पाचवा आर्टसचा. असं सगळं मिश्रण होतं.

या मिश्रणामुळे वेगळं ज्ञानही मिळत गेलं. ही मैत्री गेल्या वीस वर्षाहून अधिक काळ टिकली आहे. ती अधिक परिपक्व होत गेली. या मैत्रीत ओलावा आहे. आम्ही पाचही जण वर्षातून एकदा ठरवून भेटतो. जुन्यानव्या गोष्टींवर भरपूर चर्चा करतो. तसेच दंगामस्ती, हास्यविनोद असतो म्हणजे असतोच. 

आम्ही सर्वजण वेगवेगळ्या क्षेत्रात स्थिरस्थावर झालो आहोत. मात्र 'अभाविप'मुळे हे चार मित्र माझ्या जीवनात आले आणि मी घडत गेलो. मला राजकारणात काम करण्याची संधी मिळत गेली. एका साध्या कुटुंबातील माझ्या सारख्या मुलाला भाजपने खूप दिले. "अभाविप', भाजपचा कार्यकर्ता, पत्रकार ते प्रदेश प्रवक्ता असा माझा प्रवास आहे. 

मला यानिमित्ताने एक आठवण जरूर सांगावीशी वाटते. मी अकरावीत असताना एक लॉटरीचे तिकीट घेतले होते. मला लॉटरीही लागली होती. मी ही लॉटरी विद्याधर कुळकर्णी यांना दाखविली असता त्यांनी ते तिकीट घेतले आणि फाडून टाकले. ते म्हणाले, "" आयुष्यात जे काही कमवायचे आहे ते कष्टाने कमव. असले काम कधीही करू नको. कुळकर्णी यांचा सल्ला आयुष्यभर मानला. कष्ट घेण्यात कधी कुचराई केली नाही.

आजपर्यंतच्या आयुष्यात अनेक मित्र भेटले. प्रत्येकाचे नाव घेणे शक्‍य नाही. राजकारणात काम करीत असताना माणसं जोडत गेलो. मैत्री जपत गेलो. मात्र माझे ते चार मित्र आजही जिवाभावाचे वाटतात. ही मैत्री आयुष्याच्या शेवटच्या श्‍वासापर्यंत अशीच टिकेल. ती कधीच तुटणार नाही असा मला विश्वास आहे. 

हे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com