four wheeler gift for teacher | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

zp शाळेतील १९ मुलांना स्काॅलरशिप; शिक्षिकेला दिली चाकचाकी भेट

भरत पचंगे
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

शिक्रापूर : पिंपळे-खालसा (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद शाळेतील 19 विद्यार्थी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले. यामुळे ग्रामस्थांनी मार्गदर्शक शिक्षिका ललिता अशोक धुमाळ यांना मोटार भेट दिली. बाईंनीही तीन विद्यार्थ्यांना मनगटी घड्याळे भेट दिली.

शिक्रापूर : पिंपळे-खालसा (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद शाळेतील 19 विद्यार्थी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले. यामुळे ग्रामस्थांनी मार्गदर्शक शिक्षिका ललिता अशोक धुमाळ यांना मोटार भेट दिली. बाईंनीही तीन विद्यार्थ्यांना मनगटी घड्याळे भेट दिली.

 
पिंपळे-खालसा शाळेतील 1971 पासून आत्तापर्यंत जवळपास 450 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले. या वर्षी इयत्ता पाचवीतील 19 पैकी 3 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत चमकले, तर उर्वरित जिल्हा गुणवत्ता यादीत. ग्रामस्थांनी 2011 पासून शिक्षकांना चारचाकी व दुचाकी देण्याची प्रथा सुरू केली असून, आत्तापर्यंत तीन दुचाकी व पाच चारचाकी गाड्या भेट देण्यात आल्या.

या वर्षी इयत्ता पाचवीच्या मार्गदर्शक शिक्षिका ललिता धुमाळ यांना चारचाकी भेट दिली, तर बाईंनीही राज्य गुणवत्ता यादीत चमकलेल्या तीन विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक मनगटी घड्याळ भेट दिले. याच कार्यक्रमात कोयाळी-पुनर्वसन शाळेतील रोहिणी वसंत धुमाळ या शिक्षिकेचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर धुमाळ उपस्थिती होते. सूत्रसंचालन विलास पुंडे, तर आभार रामदास थोरात यांनी मानले. 

शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी विद्यार्थी 
दरम्यान, इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांची नावे व कंसात गुण पुढील प्रमाणे : ओम गणेश धुमाळ (राज्यात पाचवा, गुण 272), हर्षदा राजेंद्र शितोळे (राज्यात नववी, 266), गुरुदत्त माऊली धुमाळ (राज्यात दहावा, 264), प्रणव सुभाष धुमाळ (258), अजय युवराज झेंडे (254), वैष्णवी अण्णासाहेब धुमाळ (254), जय रोहिदास धुमाळ (252), सार्थक संजय सुरसे (250), जय गणेश धुमाळ व आशिष बापू दरेकर (248), गौरी मदन धुमाळ, काजल मारुती राऊत, अंजली संदीप शितोळे, हर्षदा सुनील नवगिरे (244), प्राप्ती पांडुरंग धुमाळ (242), मोहिनी भाऊसाहेब गुळवे (226), ओम सतीश धुमाळ (220), हर्षद रंगनाथ जाधव (218), संकेत सुनील धुमाळ (212). 
 

संबंधित लेख