राज्यात 4 हजार नवीन मतदान केंद्र वाढली; मार्चमध्ये आचारसंहिता शक्‍य 

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील तयारीचा आढावा घेतला आहे. या दरम्यान, राज्यात सुमारे चार हजार नवीन मतदान केंद्राची भर पडणार असून एक लाखापर्यंत एकूण मतदान केंद्रे असतील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
राज्यात 4 हजार नवीन मतदान केंद्र वाढली; मार्चमध्ये आचारसंहिता शक्‍य 

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील तयारीचा आढावा घेतला आहे. या दरम्यान, राज्यात सुमारे चार हजार नवीन मतदान केंद्राची भर पडणार असून एक लाखापर्यंत एकूण मतदान केंद्रे असतील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. 


लोकसभा निवडणुकीसाठी मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्‍यता आहे. त्या आधी केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक राज्याच्या दौऱ्यावर येणार असून निवडणूक प्रक्रियेचा अंतिम आढावा पथकाकडून घेण्यात येणार आहे. गेल्या शुक्रवार आणि शनिवारी आयोगाने राज्यातील परिस्थितीचा आढावा दिल्ली येथे घेतला आहे. या वेळी राज्यात सध्या 96 हजार मतदान केंद्रे असून त्यात आणखी चार हजार केंद्रांची भर पडणार असल्याची बाब स्पष्ट झाली. त्यामुळे राज्यातील एकूण मतदान केंद्रांची संख्या एक लाखाच्या आसपास असणार आहे. 

निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिले आहे. निवडणुकीसाठी आवश्‍यक बाबी खरेदी करण्यासाठी निविदा काढणे, मतदान केंद्र निश्‍चित करताना संवेदनशील मतदान केंद्रांचा आयोगाला अहवाल पाठवणे, प्रत्येक मतदान केंद्राची आवश्‍यक असणारे मनुष्यबळ, वाहने तसेच अन्य तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. 

लोकसभेसाठी तयारी 
- मतदान केंद्र - 96 हजार, त्यात चार हजारांची भर 
- मतदान यंत्रे आणि व्हीव्हीपॅट मशिन 1 लाख 18 हजार 
- प्रत्येक केंद्रावरील मतदान - 1200 ते 1500 

- मतदार संख्या - 8 कोटी 44 लाख 87 हजार 905 
- पुरुष मतदार - 4 कोटी 43 लाख 43 हजार 2 
- महिला मतदार - 4 कोटी 1 लाख 42 हजार 878 
- तृतीय पंथीय - 2015 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com