कर्नाटकातील ४ काँग्रेस आमदारांना मुंबईत भाजपच्या शेलारांचे 'संरक्षण' !

गेल्या चार दिवसांपासून भाजपकडे आलेले आमदार परत पाठवावेत या कामासाठी मुंबईचे अध्यक्ष संजय निरुपम यांना निरोप पाठविण्यात आला होता, असे सांगण्यात येते आहे.
shelar-Nirupam
shelar-Nirupam

मुंबई : कर्नाटकातील सरकार खेचण्याच्या घडमोडींचे परिणाम मुंबईतही जाणवत असल्याची जोरदार चर्चा आहे. कर्नाटकातील चार कॉंग्रेस आमदार मुंबईत मुक्कामी असून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची आहे. 

तर त्यांनी परत स्वगृही परत जावे याकडे लक्ष देण्याचे काम कॉंग्रेसने त्यांचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर सोपविल्याने दोन्ही प्रमुख पक्षात आज तर्कवितर्कांना उधाण आले होते.

कॉंग्रेसचे बंडखोर आमदार पवई येथील एका हॉटेलात ठेवल्याची चर्चा होती. भाजपच्या मुंबई शाखेवर त्याच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आहे, असे सांगण्यात येत होते. आशिष शेलार यांनी याकडे लक्ष ठेवावे, असे सांगण्यात आले होते. भाजपच्या नगरसेवकांनी या हॉटेलावर पहारा ठेवल्याचे सांगितले जाते. मात्र काही जणांनी हे बंडखोर आमदार पवईत नसून बांद्रा-कुर्ला परिसरात आहेत, असा दावा केला. भाजपमध्ये याबाबत गुप्तता पाळण्यात येत होती. प्राध्यापक राम शिंदे वगळता बड्या नेत्यांनी यासंबधात बोलणेही टाळले.

निरुपमांना अपयश?
गेल्या चार दिवसांपासून भाजपकडे आलेले आमदार परत पाठवावेत या कामासाठी मुंबईचे अध्यक्ष संजय निरुपम यांना निरोप पाठविण्यात आला होता, असे सांगण्यात येते आहे. मात्र निरुपम यांना या कामी अपयश आल्याची जोरदार चर्चा आहे. निरुपम यांच्या समर्थकांनी मात्र असे काहीही घडले नसल्याचे सांगत कॉंग्रेस आपापला किल्ला लढवत असून भाजपचा डाव यशस्वी होणार नाही, असा दावा केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com