foregin department in india | Sarkarnama

भारताच्या शत्रूराष्ट्राची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला नाही !

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

नागपूर : भारताची मित्र वा शत्रूराष्ट्र कोणती आहेत? याची माहिती देशाच्या केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला नाही. हे सत्य माहितीच्या अधिकारातून बाहेर आली आहे. 

नागपूर : भारताची मित्र वा शत्रूराष्ट्र कोणती आहेत? याची माहिती देशाच्या केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला नाही. हे सत्य माहितीच्या अधिकारातून बाहेर आली आहे. 
गेल्या काही दिवसांपासून जगातील काही देश भारताचे मित्र आहेत तर काही राष्ट्र शत्रू आहेत, असा आभास निर्माण केला जात आहे. न्यूज चॅनेलच्या चर्चांमधूनही हाच सूर ऐकू येतो. नागपुरातील आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला या संदर्भात विचारणा केली होती. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान, चीन, नेपाळ, म्यानमार, बांगलादेश, कोरिया गणराज्य यापैकी कोणतेही राष्ट्र हे शत्रू राष्ट्र की, मैत्रीपूर्ण संबंध आहेत यासंदर्भात परराष्ट्र व्यवहार मंत्रालया काहीच माहिती नसल्याचे त्या खात्याने कळविले आहे. 

भारत सरकारने कोणाला शत्रू राष्ट्र किंवा मैत्रीपूर्ण संबंध नसलेले राष्ट्र म्हणून घोषित केले आहे काय ? व तसे असल्यास कधीपासून अशी विचारणा अभय कोलारकर यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे केली होती. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने अमेरिका व कॅनडा ही चांगले संबंध असणारी राष्ट्र आहेत परंतु आखाती राष्ट्रातील एकही देश मैत्रीपूर्णसंबंध नसलेले असे काही घोषित करण्यात आलेले नसल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. 

या माहितीवरून भारताला घोषित शत्रूराष्ट्र नसले तरी घोषित मित्रराष्ट्र देखील कोणीच नाही काय? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील वेगवेगळ्या राष्ट्रांशी संबंधित कामकाज बघणाऱ्या विभागांकडे विचारलेली माहिती एकतर उपलब्ध नसल्याचे किंवा ती निरंक असल्याचे खास सरकारी उत्तर देऊन आरटीआय कार्यकर्त्याची बोळवण केली आहे. भारताचे मित्र राष्ट्र वा शत्रू राष्ट्र कोण? या बाबत मागितलेली माहिती निरंक कशी काय असू शकते, असा सवाल आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी विचारला आहे. 

संबंधित लेख