foolchand karad demands obc reservation for vanjaris | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

वंजारी समाजाला एनटी (ड) मधून काढा अन ओबीसीमध्ये टाका! 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 1 सप्टेंबर 2018

आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी 16 सप्टेंबर रोजी पुणे येथे बैठक होणार असल्याचे कराड यांनी जाहीर केले आहे. 

नगर : वंजारी समाजाला आरक्षणात बदल हवा आहे, या आंदोलनाची सुरुवात करून भगवान सेनेचेप्र मुख फुलचंद कराड यांनी ऐन लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तोफगोळा टाकला आहे. 

भगवान गडावर केवळ एक मिनीटांची बैठक घेवून त्यात आरक्षण ओबीसी प्रवर्गात नव्हे, तर ओबीसीमध्ये हवे, यासाठीच्या आंदोलनाची सुरुवात होत असल्याची घोषणा करून आता वंजारी समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे कराड यांनी सुचित केले आहे. 

वंजारी समाजाची लोकसंख्या सुमारे दीड कोटीच्या दरम्यान आहे. केंद्रात हा समाज ओबीसी प्रवर्गात आहे. राज्यातही एनटी (ड) या वर्गात आहे. आता या वर्गाला एन टी प्रवर्गातून काढून टाकून थेट ओबीसीमध्ये घ्यावे, तेथे एकवीस टक्के आरक्षण तरी मिळेल, अशी कराड यांची मागणी आहे. पंकजा मुंडे यांना वेळ आल्यानंतर आंदोलनात बोलावू, असा सूरही कराड यांनी लावून या आंदोलनाला मुंडे यांचा भक्कम पाठिंबा असल्याचे अप्रत्यक्षरित्या सांगितले आहे. 

 

संबंधित लेख