food minister girish bapat gets cow as a gift | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

अन्नमंत्री गिरीश बापट यांना दुभती गाय भेट

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

पुणे : गावात येणाऱ्या राजकीय पाहुण्याला काय भेट द्यावी, असा प्रश्न अनेकदा गावकऱ्यांना पडतो. पुण्याजवळील बालेवाडी ग्रामस्थांनी मात्र यावर शक्कल लढविली. पुण्याचे पालकमंत्री तसेच अन्न आणि पुरवठामंत्री गिरीश बापट यांना थेट दुभती गाय वासरासह भेट देऊन चकीत केले.

पुणे : गावात येणाऱ्या राजकीय पाहुण्याला काय भेट द्यावी, असा प्रश्न अनेकदा गावकऱ्यांना पडतो. पुण्याजवळील बालेवाडी ग्रामस्थांनी मात्र यावर शक्कल लढविली. पुण्याचे पालकमंत्री तसेच अन्न आणि पुरवठामंत्री गिरीश बापट यांना थेट दुभती गाय वासरासह भेट देऊन चकीत केले.

भाजपच्या नेत्यांसाठी गाय हा जिव्हाळ्याचा विषय असल्याने या भेटीने बापटही आनंदित झाले. बापट हे पुण्यातील शनिवार पेठेत राहतात. तेथे गाय सांभाळणे जिकिरीचे ठरते. त्यामुळे त्यांनी ही गाय त्यांच्या तळेगाव दाभाडे येथील शेतावर पाळण्याचे ठरविले आहे. राज्यात दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याच्या तक्रारी वारंवार होत असतात. त्यावर कारवाई अधिकार बापट यांच्याच खात्याला आहेत. मात्र या खात्याच्या मंत्र्याला तरी शु्द्ध दूध मिळण्याची सोय या गायीमुळे झाली आहे.

स्मार्ट सिटी अंतर्गत येणाऱ्या विविध प्रकल्पांचा प्रारंभ बालेवाडी येथील दसरा चौकात बापट यांच्या हस्ते झाला. यावेळी विठ्ठल-रुक्मिणी चॅरिटेबल ट्रस्ट बालेवाडी यांच्या वतीने ट्रस्ट चे अध्यक्ष संजय बालवडकर व ह.भ.प.पैठणकर महाराज यांच्या हस्ते समस्त बालेवाडी ग्रामस्थांच्या वतीने ही भेट देण्यात आली.

या वेळी राज्यमंत्री विजय शिवतारे, महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्मार्ट सिटीचे सीईओ राजेंद्र जगताप, स्थानिक नगरसेवक अमोल बालवडकर, बाबूराव चांदेरे, स्वप्नाली रायकर, ज्योती कळमकर आदी उपस्थित होते.

पुण्यामध्ये सर्वात उत्तम रीतीने विकसित होत असलेला परिसर म्हणून औंध-बाणेर-बालेवाडी परिसराकडे पाहिले जाते. अनेक पथदर्शी प्रकल्प सध्या औंध-बाणेर-बालेवाडी परिसरात राबवले जात आहेत आणि यापुढेही पुणे स्मार्ट सिटीचा विकास असाच सुरू राहील. भविष्यात बाणेर-बालेवाडी भाग हा देशात रोल मॉडेल म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास बापट यांनी व्यक्त केला.

पुढील दोन वर्षात बालेवाडी भागातील सर्व डीपी रस्ते पूर्ण करण्याचा मानस अाहे. त्यासाठी भूसंपादन प्रक्रियेत ग्रामस्तांना सहकार्य करावे. रस्ते विकसित झाल्याने ग्रामस्थांना व जमीनधारकांना देखील याचा फायदा होईल व भविष्य अधिक सुकर होईल, असा विश्वास प्रभाग समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर यांनी व्यक्त केला. 

संबंधित लेख