रोज बारा मैल धावणारे आयुक्त महेश झगडे

मंत्रालय असो वा कार्यालय ते सदैव लिफ्टऐवजी जिने चढुन जातात. रोज बारा किलोमीटर जॉगिंगचा त्यांचा नेम चुकत नाही. सकाळी दीड तास व्यायाम ठरलेला असतो. एव्हढेच काय वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या तिसाव्या मजल्यावरील कार्यालयातही ते जिन्याने जात असत....तुम्हाला काय वाटले?
रोज बारा मैल धावणारे आयुक्त महेश झगडे

नाशिक : मंत्रालय असो वा कार्यालय ते सदैव लिफ्टऐवजी जिने चढुन जातात. रोज बारा किलोमीटर जॉगिंगचा त्यांचा नेम चुकत नाही. सकाळी दीड तास व्यायाम ठरलेला असतो. एव्हढेच काय वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या तिसाव्या मजल्यावरील कार्यालयातही ते जिन्याने जात असत....तुम्हाला काय वाटले?

संस्कृत मधील 'लवकर निजे, लवकर उठे, त्यास आयु-आरोग्य लाभे!' हे सुभाषीत असो वा इंग्रजीतील 'अर्ली टू बेड अँड अर्ली टू राइज, मेक्‍स अ मॅन हेल्दी, वेल्दी अँड वाईज' ही म्हण. अर्थात जो सकाळी लवकर उठतो तो आरोग्यदायी, बुद्धीमान आणि संपन्न असतो ही सर्व लक्षणे 1993 च्या भारतीय प्रशासन सेवेच्या (आय.ए.एस.) तुकडीचे सनदी अधिकारी महेश झगडे यांच्याशी तंतोतंत जुळतात.

गेली अनेक वर्षे त्यांची दिनचर्या म्हणजे, सकाळी सहाला उठणे. एक-दीड तास हलका व्यायाम. वर्तमानपत्र वाचन. सकाळी साडे नऊ ते दहा या वेळेत नाश्‍ता आणि दुपारचे जेवण एकत्रच घेणे. कार्यालयात जाणे. त्यानंतर साडे चार ते पाच दरम्यान सायंकाळचे जेवण. त्यानंतर सातला जॉगिंग. पूर्वी ते पूर्ण बारा मैल धावायचे. आता सहा मैल धावतात. सहा मैल जलद चालतात. यात कार्यालयाच्या कामाच्या स्वरुपानुसार क्वचीत थोडा फार बदल होतो. त्याला आठवड्यातून एकदा ट्रेकिंगची जोड त्यांनी दिली आहे. अगदी परदेशात असतांनाही हा नेम चुकलेला नाही. पावसाळ्यात पाऊस किंवा उन्हाळ्यात किती उष्मा असला तरी त्याचा व्यायाम थांबलेला नाही. पुणे शहरात असताना अनेकदा प्रवासादरम्यान ते खंडाळा घाटात वाहन पुढे पाठवुन देत व घाट चढुन जात असत.

आपल्या या दिनक्रमाबाबत झगडे सांगतात.....''या सगळ्याचा मला खुप फायदा झाला आहे. कामाच्या ताण- तणावातून मी अलिप्त राहू शकतो. कोणतेही निर्णय घेतांना माझ्यावर तणाव नसतो. कशाचाही दबाव येत नाही. सकारात्मक विचार- चिंतन, मनन करता येत असल्याने प्रसन्न व हलके वाटते. शांत झोप लागते. आठवी- नववीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे 'क्‍लीअर थिंकींग' असते. कितीही उशीरा झोपलो तरीही सकाळी सहाला उठतो. माझे वजन 62 ते 64 यापेक्षा कमी किंवा जास्त होत नाही. मुख्य म्हणजे या दिनचर्येमुळे माझा हॅप्पी इंडेक्‍स नेहेमी सर्वाधीक असतो. त्यामुळे माझा रक्तदाब किमान 70 ते 80 आणि कमाल 110 ते 120 असा स्थिर असतो. शुगर, काॅलेस्टराॅलचे पॅरामीटर अगदी तरुणासारखे किंवा त्याहूनही चांगले राहते. त्यामुळे मला ह्रदयविकार, डायबीटीस आणि स्ट्रोक यापासून मी सुरक्षीत आहे.'' आरोग्यविषयक सरकारचे पैसे मी वाचविले आहे. असे ते गमतीने सांगतात.

झगडे पुढे सांगतात... "मी डायटींग वगैरे करत नाही. भरपुर जेवतो. मला शाकाहार आवडतो. ताजे व गरम जेवण पसंत करतो. कारले, मेथी जेवढी कडू असेल तेवढी मला चालते. तिखट, तेलकट सर्व जेवण मला चालते. दिवसभरात क्वचितच चहा घेतो. मात्र, त्यासाठी काहीही दुराग्रह नसतो. त्याचा मला दैनंदीन कामातही खुप फायदो होतो. अन्य सहकाऱ्यांच्या तुलनेत माझा स्टॅमीना सहकाऱ्यांच्या तुलनेत जास्त आहे असा अनुभव सातत्याने येत असतो. मंत्रालयात असतांना मी कधी लिफ्टचा वापर केला नाही. मंत्रालयात आग लागली तेव्हा मी परिवहन आयुक्त होतो. ते कार्यालय तत्पुरत्या स्वरुपात वर्ल्ड ट्रेड सेंटरला हलविले होतो. या कार्यालयात जेव्हा केव्हा गेलो तेव्हा तिसाव्या मजल्यावरील कार्यालयात मी जिने चढुन गेलो. तीथेही लिफ्टचा वापर केला नाही.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com