fist built father`s memorial then ram temple : Ajit Pawar | Sarkarnama

उद्धव यांनी आधी वडिलांच स्मारक बांधाव मग राममंदिराच बघाव : अजित पवारांचा सल्ला

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

पुणे : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावक कडवट टीका केली. उद्धव यांनी राम मंदिराआधी वडिलांचं स्मारक बांधावं, असा सल्ला अजितदादांनी दिला. हे स्मारक बांधल्यानंतर लोकांना वाटेल की हे राम मंदिर बांधू शकतात, असा टोमणा त्यांनी मारला.

पुणे : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावक कडवट टीका केली. उद्धव यांनी राम मंदिराआधी वडिलांचं स्मारक बांधावं, असा सल्ला अजितदादांनी दिला. हे स्मारक बांधल्यानंतर लोकांना वाटेल की हे राम मंदिर बांधू शकतात, असा टोमणा त्यांनी मारला.

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वतीने दुष्काळ जाहीर करण्यासाठी आयोजित केलेल्या आंदोलनानंतर ते बोलत होते. ते म्हणाले की राम मंदिराचं राजकारण केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सुरू झालेले आहे. गेली  चार वर्षे सेनेलाही या विषयावर कोणी थांबवलेले नव्हतं. जनतेला भावनिक करुन जातीय तेढ निर्माण करायची, जातीय विष पेरायचं काम हे पक्ष करत आहेत. आधी वडिलांचं स्मारक बनवा, ते स्मारक बांधल्यावर लोकांना वाटेल हे राम मंदिर बांधू शकतात.

अयोध्येत सेना अस्तित्वात आहे का? तिथं मंदिर बांधायला कोण मदत करणार? आपला पक्ष कुठं अस्तित्वात आहे, हे पाहावे. इतकंच जर वाटत असेल तर राम मंदिर बांधण्याची तारीख उद्धव ठाकरे यांनी जाहीर करावी. आहे तेवढी धमक आहे का? त्यामुळे राम मंदिरावर सेनेची बनवाबनवी सुरू असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

भाजप सरकारवर टीका करताना त्यांनी सांगितले की दुष्काळ जाहीर करण्याची ३१ ऑक्टोबर ही तारीख म्हणजे सरकारचे वेळकाढूपणाचं धोरण आहे.  कारण नसताना दुष्काळ जाहीर करायला सरकारकडून विलंब होत आहे. शेजारच्या कर्नाटकात दुष्काळ जाहीर होतो, मग आपल्याकडे का नाही, असा सवाल त्यांनी केला.

एकीकडे पंतप्रधान शिर्डीत म्हणतात की दुष्काळासाठी पैसा कमी पडू देणार नाही, मात्र मुख्यमंत्री केंद्राचं पथक येईल असे सांगतात. दुष्काळाबाबत सरकारची दुटप्पी भूमिका आहे. खरीप आणि रब्बी दोन्ही हंगाम वाया गेले आहेत. हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करा, अशी मागणी त्यांनी केली.

जलयुक्त शिवार योजनेवरही त्यांनी टीका केली. या योजनेसाठी साडेसात हजार कोटी खर्च झाले, मग भूजल पातळी वाढायला हवी होती. येत्या आठ महिन्यात पाणीपातळी आणखी खाली जाणार आहे. `जलयुक्त'वर सरकारने आत्मचिंतन करावे. या योजनेवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत. त्याची चौकशी सरकारने करावी, अशी मागणी त्यांनी केली. 

संबंधित लेख