First prepare highway then fight for naming it : Nawab Malik | Sarkarnama

आधी  महामार्ग तर बनवा मग नावासाठी भांडा-  नवाब मलिक

सरकारनामा
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

*

मुंबई  : "समृद्धी महामार्गातील शेतकऱ्यांवर अन्याय न करता समृद्धी महामार्ग बनवा नंतर नावासाठी भांडणे करा," असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी सरकारला लगावला.

समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे अशी मागणी शिवसेनेने तर भाजपने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची मागणी केली आहे.यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी टीका केली आहे. 

सुरुवातीला समृद्धी महामार्गाला विरोध करायचा आणि आता त्याच समृद्धी महामार्गाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यासाठी भांडणे सुरु करायची ही दुटप्पी भूमिका शिवसेनेची सुरु आहे असे मलिक म्हणाले.

मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गाचे भूसंपादन होत असताना त्यामध्ये जमीनी गेलेल्या शेतकऱ्यांच्या बाजूने राहण्याची भूमिका शिवसेनेने सुरुवातीला घेतली होती.मात्र आता शिवसेनेची भूमिका बदलली असून शिवसेनेने शेतकऱ्यांच्या बाजूने न राहता समृद्धी महामार्गाच्या बाजूने कौल दिला आहे यावरुन भाजप-शिवसेना युतीचा कारभार कसा सुरु आहे लक्षात येते असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.
 

संबंधित लेख