आधी मराठा नंतर मी आमदार : बाळा भेगडे

bala bhehade
bala bhehade

मावळ : पिंपरी-चिंचवडमधील भाजपसह शिवसेना आमदारांनी आजचा बंद व त्यातील ठिय्या आंदोलनापासून चार हात दूर राहणे पसंत केले असताना, पुणे जिल्ह्यातील मावळचे भाजप आमदार, संजय ऊर्फ बाळा भेगडे हे, मात्र  काल त्यात सामील झाले. एवढेच नाही, सकल मराठा मोर्चाने त्यांच्या कार्यालयासमोर केलेल्या ठिय्या आंदोलनातही ते सहभागी झाले. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे.

मराठा कार्यकर्त्यांकडून आमदार,खासदारांच्या घरासमोर आंदोलन सुरु असताना भेगडे यांचा हा पवित्रा आंदोलकांनाही अप्रूप वाटणारा ठरला. सत्ताधारी पक्षाचे जिल्हाध्यक्षही असलेले भेगडे यांची ही सडेतोड भूमिका मराठा आंदोलकांना आवडली. 

भेगडे हे केवळ मूकपणे आंदोलनात सहभागी झाले नाही. तर, त्यांनी भाषणङी ठोकले. आमदारकी अथवा राजकीय पक्ष कार्यकर्त्याच्या अगोदर मुळात मी एक मराठा असल्याचे त्यांनी ठामपणाने सांगितले. आंदोलनकर्त्यांसोबत आरक्षण आमच्या हक्काचे अशा घोषणाही दिल्या.

मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी गुरुवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये तळेगाव-चाकण महामार्गावर तळेगाव दाभाडे सकल मराठा समाजातर्फे मराठा क्रांती चौकात करण्यात आलेल्या रास्ता रोकोमध्ये आमदार भेगडे आणि सर्वपक्षीय नेते सुरुवातीपासूनच सामील झाले होते. जवळपास दोन तास ते चालले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आमदारांच्या कार्यालयासमोर भर पावसात ठिय्या आंदोलन सुरु केले.

आमदार भेगडे हेही आंदोलनकर्त्यांच्या गराड्यात जाऊन स्वतःच्याच कार्यालयासमोर ठिय्या मांडून बसले. विशेष म्हणजे आमदार भेगडे यांनी जोरात एक मराठा...लाख मराठा,आरक्षण आमच्या हक्काचे,तुमचे आमचे नाते काय?...जय जिजाऊ...जय शिवराय अशा घोषणा दिल्या. 

मराठा आंदोलकांबाबत पोलीस प्रशासन साप म्हणून भुई धोपटत असल्याचा आरोप भेगडे यांनी केला.ते म्हणाले,""मराठा आंदोलनाला पाठींबा म्हणून आंदोलनकर्त्यांच्या भावना आणि मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचे काम करणार आहे. इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी आहे. चाकणला गेल्या महिन्यात झालेली दंगल समर्थनीय नसून,मराठा आंदोलनाला बदनाम करण्याचा तो डाव होता. दोषी नसलेल्या मराठा आंदोलकांवर लावण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी सभागृहात करणार आहे. विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचा ठराव करुन उघड पाठींबा देणार आहे''. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com