Fire controlled in Girish bapat' bunlow | Sarkarnama

गिरीश बापट यांच्या सरकारी निवासस्थानाला लागलेली आग झटपट नियंत्रणात

सरकारनामा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

 मुंबई  : अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्या सरकारी निवासस्थानात सोमवारी रात्री आग लागली. अग्निशामक दलाच्या पथकाने तातडीने धाव घेऊन 15 मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' बंगल्याच्या बाजूला असलेल्या बापट यांच्या 'ज्ञानेश्‍वरी' या बंगल्यात सोमवारी रात्री 9 च्या सुमारास आग लागली. बंगल्यात असलेल्या सर्व्हन्ट क्वार्टरमध्ये ही आग लागली . लागलेली आग 'ज्ञानेश्‍वरी' बंगल्यात पसरली.

ही माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. या वेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. अग्निशामक दलाने रात्री सव्वानऊच्या सुमारास आग आटोक्‍यात आणली. या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही, असे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे पोलिसांनी सांगितले.
 
संबंधित लेख