fir aginst corporator hemant shetty | Sarkarnama

नाशिक पोलिसांच्या हातावर तुरी देवून भाजपचा 'जुगारी नगरसेवक' पळाला!

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

हे संरक्षक भिंतीवरून उड्या मारून फरारी झाल्याचे
सांगण्यात आले.  

नाशिक : शहरातील वाघाडी परिसरातील जुगार अड्डयावर मंगळवारी पोलिसांनी छापा टाकला. यावेळी 'अंदर-बाहर' नावाचा जुगार सुरु असल्याचे आढळले. यामध्ये जुगार खेळणारे भाजप नगरसेवक हेमंत शेट्टीसह आठ जुगाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेच्या युनिट 1 च्या पथकाच्या कारवाई दरम्यान पाच जणांना अटक करण्यात आली. नगरसेवकशेट्टींसह इतरांनी मात्र पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या.

या छाप्यात पाच जुगाऱ्यांना अटक करून 16 हजार 320 रुपये पोलिसांनी जप्त केले. संशयितांमध्ये भाजपचे प्रभाग चारचे
नगरसेवक हेमंत शेट्टी यांचा समावेश आहे. पंचवटी पोलिस ठाण्याच्या मागच्या बाजूला मेरीच्या खुल्या मैदानावर
अंदर-बाहर नावाचा जुगार खेळला जात असल्याची माहिती गुन्हे शोध पथकाचे वरिष्ठ निरीक्षक आनंद वाघ यांना मिळाली.
त्यानुसार पथकाने सोमवारी (ता. 12) सायंकाळी सहाच्या सुमारास कारवाई करत पाच संशयितांना अटक केली.
गुन्हे शाखेचे हवालदार प्रवीण कोकाटे यांनी याप्रकरणी तक्रार दिली.

कारवाईत संशयित जमीर शेख, कुणाल पाटील, रमीज शेख, योगेश आव्हाड, संभाजी कदम यांना अटक केली. नगरसेवक
हेमंत शेट्टीसह भरत पुराणिक ऊर्फ डागन, सचिन पाटील ऊर्फ जॅक हे संरक्षक भिंतीवरून उड्या मारून फरारी झाल्याचे
सांगण्यात आले.  

संबंधित लेख