अखेर गृहराज्यमंत्र्यांच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल 

घुंगशी येथील भाऊसाहेब देशमुख विद्यालयात अनधिकृतपणे जाऊन तेथील दस्तावेजाची फेकाफेक करीत कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या तक्रारीवरून राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे वडिल माजी आमदार विठ्ठलराव पाटील यांच्याविरुद्ध मुर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
vithhalrao patil
vithhalrao patil

अकोला : घुंगशी येथील भाऊसाहेब देशमुख विद्यालयात अनधिकृतपणे जाऊन तेथील दस्तावेजाची फेकाफेक करीत कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या तक्रारीवरून राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे वडिल माजी आमदार विठ्ठलराव पाटील यांच्याविरुद्ध मुर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे वडिल माजी आमदार व्ही. एन. पाटील यांनी शनिवार घुंगशी येथील भाऊसाहेब देशमुख विद्यालयात जात तेथील कर्मचाऱ्याला शिविगाळ करीत मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्ही. एन. पाटील यांचे घुंगशी हे मुळ गाव असून याच गावात पाटील आणि विज्युक्‍टा संघटनेचे पदाधिकारी असलेले प्रा. संजय देशमुख या दोघांचेही वेगवेगळे महाविद्यालय आहे. मात्र, शाळेतील पटसंख्या कमी होण्यावरून दोन्ही संस्थांमध्ये गत काही वर्षांपासून शितयुद्ध सुरू आहे.

शनिवारी गृहराज्यमंत्री डॉ. पाटील यांचे वडील माजी आमदार व्ही. एन. पाटील यांनी संजय देशमुख यांनी माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षण निरिक्षक आत्माराम राठोड यांना सोबत घेऊन भाऊसाहेब देशमुख विद्यालयात जाऊन तपासणी केली. पाटील हे महाविद्यालयाची तपासणी करत असताना शाळेचे प्राचार्य संजय आठवले हे मोबाईलमध्ये व्हिडीओ शुटींग घेत होते. त्यावर व्हिडीओ शुटींग कशाला घेता असे म्हणत पाटील यांनी प्राचार्य व कर्मचाऱ्यांशी वाद घातला. हा वाद एवढा वाढला की व्ही. एन. पाटील यांनी शाळेतील कर्मचारी अमोल काळे यांना कानशिलात लगावली. तर प्राचार्य आठवलेंना शिवीगाळ केल्याचा सर्व घटनाक्रमाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यावर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.

या प्रकरणात प्राचार्य आठवले व कर्मचारी काळे यांनी मुर्तिजापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात व्ही. एन. पाटील यांनी अनधिकृतपणे विद्यालयात येत तपासणी केली असून महत्वपूर्ण कागदपत्राची फेकफाक करीत जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तब्बल पाच दिवस या प्रकरणात कोणतीच कारवाई केली नसल्याने माध्यमांकडून या प्रकरणात राजकीय दबाव येत असल्याच्या बातम्या प्रकाशीत झाल्या होत्या. अखेर मुर्तिजापूर पोलिसांनी शिक्षण निरिक्षक राठोड यांच्यासह आठवले व काळे यांचे बयाण नोंदविले. गुरूवारी सायंकाळी व्हि. एन. पाटील यांच्याविरुद्ध कलम 323, 504 नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com