fir against shivraj more | Sarkarnama

NSUI चे माजी प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरेवर पेट्रोल चोरीचा गुन्हा

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

पेट्रोल पंपावर डिझेल चोरी करून फसवणूक केल्याप्रकरणी एनएसयुआयचे माजी प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे (रा. कऱ्हाड) यांच्यावर बोरगांव (ता. सातारा) येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : पेट्रोल पंपावर डिझेल चोरी करून फसवणूक केल्याप्रकरणी एनएसयुआयचे माजी प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे (रा. कऱ्हाड) यांच्यावर बोरगांव (ता. सातारा) येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  

बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वळसे येथील पेट्रोलपंपावर इंधन भरण्यासाठी 13 सप्टेंबरला शिवराज मोरे व त्यांचे साथीदार एमएच 50, 5657 या क्रमांकाच्या गाडीसह थांबले होते. त्यांनी इंधन भरल्यानंतर पंपावरील कर्मचारी पैसे मागण्यासाठी गेला असता त्याला शिवीगाळ आणि दमदाटी करून पैसे न देताच निघुन गेले.

त्यांच्यापाठोपाठ त्यांचे साथीदारही गाड्या घेऊन निघून गेले. याबाबत संबंधित कर्मचाऱ्याने बोरगाव, उंब्रज आणि तळबीड पोलिस स्टेशनला दूरध्वनीव्दारे संपर्क करून याबाबतची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी संबंधित गाडीची माहिती घेतली असता स्वत: शिवराज मोरे गाडीत असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पंपावरील कर्मचाऱ्याने बोरगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यावरून शिवराज मोरेंवर फसवणूक व इंधन चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. वळसे येथील हा पेट्रोलपंप हा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील यांचा आहे.  

संबंधित लेख