fir against rohan subhash deshmukh in solapur | Sarkarnama

सुभाष देशमुख यांच्या मुलासह 'लोकमंगल'च्या 9 संचालकांना कोणत्याही क्षणी अटक?

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 28 नोव्हेंबर 2018

रोहन देशमुख हे राज्यसभा खासदार संजय काकडे यांचे जावई आहेत.

सोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा मुलगा रोहन देशमुख याच्यासह लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटी (बीबीदारफळ, ता. उत्तर सोलापूर) या संस्थेच्या नऊ संचालकांवर बुधवारी सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला. 

दुग्धशाळा विस्तारीकरण व दूधभुकटी प्रकल्प उभारणीसाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणात कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

प्रभारी जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी पांडुरंग दादू येडके (रा. आकाश दर्शन सोसायटी, कोथरूड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकमंगल सोसायटी या संस्थेचे तत्कालीन पदाधिकारी रोहन सुभाष देशमुख, रामराजे राजेसाहेब पाटील, अविनाश लक्ष्मण महागावकर, प्रकाश वैजिनाथ लातूरे, सचिन पंचप्पा कल्याणशेट्टी, बशीर बादशहा शेख, मुरारी सारंग शिंदे, हरिभाऊ धनाजी चौगुले, भीमाशंकर सिद्राल नरसगोंडे अशी आरोपींची नावे आहेत. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख