शिवसेना गटनेते राहूल कलाटेंची डेप्युटी इंजिनिअरला मारहाण

उपअभियंते अनिल महादेव राऊत (वय ५२, रा. आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ, चिंचवड) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शिवसेना गटनेते राहूल कलाटेंची डेप्युटी इंजिनिअरला मारहाण

पिंपरी: पिंपरी चिंचवड महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे (वय ३५, रा.वाकड) यांनी पालिकेच्या डेप्युटी इंजिनिअरला पालिकेतच मारहाण केली. सोमवारी ही घटना घडली. मात्र, या प्रकाराने घाबरुन गेल्याने या इंजिनिअरने आज तक्रार दिली.  

सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा कलाटेंविरुध्द नोंद केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याबाबत पालिकेच्या बांधकाम विभागातील उपअभियंते अनिल महादेव राऊत (वय ५२, रा. आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ, चिंचवड) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पालिकेतील कार्यकारी अभियंता सतीश इंगळे यांच्या केबिनमध्ये हा प्रकार घडला आहे. कलाटे यांच्या टीडीआर हस्तांतरण फाईलवर पालिका आयुक्तांची सही न घेतल्यातून हा प्रकार झाल्याचे समजले. त्यात विनोद मोरे (वय २८, रा. पिंपरी) या आर्किटेक्टरकडे  काम करणाऱ्यालाही आरोपी करण्यात आले आहे. कलाटे यांनी खुर्ची फेकून मारली. तसेच गचांडी पकडून मारहाण केली, असे तक्रारीत म्हटले आहे. 

दरम्यान, ''आगामी निवडणुकीत  मला आणि माझ्या पक्षाला बदनाम करण्यासाठी भाजपने रचलेले हे षडयंत्र आहे.''असे कलाटे यांनी  सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com