खासदार आढळरावांच्या फंडातील कामाची चौकशी करणाऱ्या तिंघावर गुन्हा

खासदार आढळरावांच्या फंडातील कामाची चौकशी करणाऱ्या तिंघावर गुन्हा

शिक्रापूर : पाबळ (ता.शिरूर) येथील शाळांमध्ये आलेल्या खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या खासदार फंडाची व त्यातून झालेल्या खरेदीची थेट चेकींग ऑफीसर म्हणून चौकशी करणा-या तिघांवर शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

पाबळचे माजी सरपंच तथा पाबळ शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार सोपान जाधव यांच्या तक्रारीवरुन सदर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी श्रीराम अशोकसिंह परदेशी याचेसह दोन अनोळखी व्यक्तिंवर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिते शिक्रापूर पोलिसांनी दिली.

याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी. पाबळ (ता.शिरूर) येथील श्री भैरवनाथ विद्यामंदिर येथे दहा दिवसांपूर्वी १८ तारखेला तीन अनोळखी इसम एका दुचाकीवर (एम एच १४-सीआर-५१८८) आले होते. आपल्या शाळेत खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या फंडातून झालेल्या सर्व खरेदीची माहिती द्या, या फंडातील खरेदीत बरीच अफरातफर झाल्याचे सांगत त्यांनी सर्व बिले मुख्याध्यापक कैलास धुमाळ यांना मागितली. दरम्यान बीले मागितल्यावर मुख्याध्यापकांनी या तिघांनाही आपली ओळखपत्रे मागितली. यावेळी मुख्याध्यापकांना अरेरावी करीत तिघांनीही आपल्याला आमची ओळखपत्रे मागण्याचा अधिकार नाही, असे सांगितले. साहित्याची खरेदी बरोबर आहे असे म्हणून निघून गेले पण जाताना एकाने श्रीराम अशोकसिंह परदेशी असे नाव सांगितले.      

हेच त्रिकुट काही वेळातच शेजारील जिल्हा परिषद शाळेत गेले व तेथील मुख्याध्यापक संतोष जाधव यांचेकडून संगणक व इतर खासदार फंडातील खरेदीची चौकशी करुन तेथून हे सर्वजण निघून गेल्याचे सांगितले. याबाबत दोन्ही मुख्याध्यापकांना अरेरावी व ओळखपत्र न दाखविता अनाधिकाराने माहिती घेणा-या श्रीराम अशोकसिंह परदेशी व इतर दोन अनोळखी व्यक्तिंच्या विरोधात पाबळ शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार तथा माजी सरपंच सोपान जाधव यांनी वरील तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

प्रकरण शेवटाला नेणारच : जाधव

या प्रकरणातील फिर्यादी माजी सरपंच सोपान जाधव यांनी सांगितले की, संबंधित आम्ही तक्रार केलेल्या तिघांकडून केवळ खासदार आढळराव यांच्याच फंडाची चौकशी का केली जातेय याला राजकीय रंग आहे हे नव्याने सांगायला नको. मात्र आरोपींच्या मागे कोण आहे हे शोधून काढून त्याचेवरही कारवाई व्हावी यासाठी या प्रकरणाच्या शेवटापर्यंत आपण पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सरकारनामाशी बोलताना सांगितले. अर्थात माहिती अधिकार कार्यकर्ता असताना त्याने सरकारी अधिकारी सांगणे हेच गंभीर असल्याने सरकारच्या नावाचा गैरवापर करण्याबाबतही आणखी कलमे त्यावर वाढवावीत असाही आपला आग्रह राहणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com