finance-minister-sudhir-mungantiwar-budget 2018 | Sarkarnama

शेतकऱ्यांचे हित जपणे हा राज्याचा प्राधान्यक्रम - सुधीर मुनगंटीवार

ब्रह्मा चट्टे : सरकारनामा न्यूज ब्यूरो
शुक्रवार, 9 मार्च 2018

खूप करो साहिब कोशिश

हमे मिटीमें दबाने की,

हम बिज है हमे आदत है

बार बार उग जाने की

-सुधीर मुनगंटीवार

मुंबई : शेतकऱ्यांचे हित जपणे हा  राज्याचा  प्राधान्यक्रम आहे. छत्रपती शेतकरी सन्मान योजना 2017 क्षेत्राचा विचार न करता सरसकट दीड  लाख रुपये   कर्जमाफ करण्याचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत 35 लाख 38 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आलाआहे ", असे सुधीर  मुनगंटीवार यांनी सांगितले . आज  विधानसभेत भाजप शिवसेना युती सरकारचा चौथा अर्थसंकल्प अर्थमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी मांडला.

यावेळी बोलाताना सुधिर मुनगंटीवार म्हणाले," छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करतो .  जाणता राजाचे स्वप्न पुर्ण करण्याचा मी  राज्यातील चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या  जनतेला विश्वास देतो.1224 दिवस या जनतेची सेवा हे सरकार करत आहे. राज्याच्या जनतेच्या सेवा करताना सब का साथ सब का विकास करत महाराष्ट्र प्रगतीप्रथावर आहे. राज्याचा चौथा अर्थसंकल्पसादर करताना मला आनंद होत आहे. "

" शिवस्मारकाचे जल व भूमिपुजन पंतप्रधनांनाच्या हस्ते करण्यात आले. आता हा प्रकल्प 36 महिन्यात पुर्ण करण्यात येईल. 150 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. कृषी, वस्त्रोद्योग, पर्यटन, कौशल्य विकासात वाढ करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. पायाभूत सुविधा व कृषी क्षेत्रा गुंतवणुकित वाढ करण्यात आली आहे. "

" विदर्भ, मराठावाडा या कापूस उत्पादक क्षेत्रामध्ये 45 टक्के प्रकल्प खर्च देण्यात येणार आहे. राज्याच्या विकासात लाँजिस्टीक धोरण तयार करण्यात आले आहे. लाँजेस्टीक क्षेत्राला उद्योग म्हणून मान्यता देण्यात आली आहे. अवकाश व संरक्षण क्षेत्र धोरण जाहिर करण्यात आले आहे.'

" राज्यातील लघू उद्योगांसाठी शंभर कोटी रूपये अनुदान दिले जाईल. महिला उद्योगांच्या संख्येत 9 टक्क्यांवरून 20 टक्के पर्यंत वाढवणे हे उद्देश ठेवण्यात आले आहे. जलसंपदा विभागासाठी 8233 कोटी 12 लक्ष तरतूद करण्यात आली आहे. जल युक्तच्या माध्यमातून 11 हजार गावांना जलयुक्त करण्यात आले आहे. जलयुक्त योजनेसाठी 1500 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. "

" मागेल त्याला  तळे या योजनेत 62 हजार शेततळी पुर्ण करण्यात आली आहेत. विहिरी व शेततळी यासाठी 162 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आले आहे. शेंद्रीय शेतीचा पुरस्कार करण्यात येत आहे.शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च कमी करण्यासाठी 100 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. शेतमालाच्या प्रक्रीया उद्योगासाठी 50 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. " 

" शेतमाल तारण योजनेसाठी 9 कोटा रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील शेतमाल वाहतूक जलद होण्यासाठी एसटी महामंडळाच्या मार्फत वाहतूक करण्यात येणार आहे. त्यासाठी महामंडळाच्या वतीने नविन सेवा सुरू करण्यात येणार आहे. राज्यात महामंडळाचे बस स्थानके 609 इतके आहे. त्यांचे दुरूस्ती 142 कोटी रूपये निधी दिली आहे. 18 -19 साठी प्रस्तावित 40 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी तुतीच्या लागवडीसाठी 9 कोटी रूपयांची तरतूद करण्यात येणार आहे ", असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

सुधिर मुनगंटीवार पुढे म्हणाले, " परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या युवकांना माहिती देण्यासाठी त्यांची फसवणूक होवू नये यासाठी कौश्यल विकास कार्यकर्मात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्यात सहा कौशल्य विद्यापिठाची स्थापना करण्यात येणार आहे. यावेळी हिंदी शेर सादर करत मुनगंटीवार म्हणाले, " खूप करो साहिब कोशिश हमे मिटीमें दबाने की, हम बिज है हमे आदत है बार बार उग जाने की, असा शेर मारत विरोधकांना चिमटा काढला.

ते पुढे म्हणाले, " प्रत्येक जिल्हा स्थरावर स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र स्थापन करणार आहोत. त्यासाठी 50 कोटी राखून ठेवण्यात येणार आहेत.आण्णासाहेब महामंडळासाठी 50 कोटीवरून 400 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात 100 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा स्थापन करण्यात येणार आहेत. त्यासाठी आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी 36 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राजश्री शाहू महाराज फी परिपुर्ती योजनेतील उत्पन्न मर्यादा सहा लाखावरून आठ लाख करण्यात आली आल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

यावेळी बसल्या जागेवरून विरोधीबाकावरून टिप्पणी करण्यात आली. यावेळी चिडून मुनगंटीवार म्हणाले, " मराठा समाजासाठी ही उत्पन्न मर्यादा महत्वाची आहे. तिची खिल्ली उडवी नका. अन्यथा  पुढच्या वेळेस तुम्हाला जनता निवडून देणार नाही. "

मुनगंटीवार म्हणाले, " मुंबई नागपूर समृध्दी महामार्ग राज्यासाठी महत्वाचा आहे. नागपूर मुंबई कम्यूनिकेशन एक्सप्रेस वे या भूसंपादनाची भूमोजनी 99 टक्के पुर्ण झाली आहे. तर भूसंपादनाची 64 टक्के प्रकिर्या पुर्ण झाले आहे. एप्रिलमध्ये सुरू होणे अपेक्षीत आहे असल्याचे मुनगंटावार यांनी सांगितले.

संबंधित लेख