पक्षातूनच तिकीट कापण्याचा प्रयत्न झाले पण अखेर संजय धोत्रेंनाच उमेदवारी

गेल्या काही दिवसांपासून संजय धोत्रे यांना भाजपची उमेदवारी मिळणार किंवा नाही याबाबत उलट सुलट चर्चा सुरू होती. संजय धोत्रे यांच्या जागेवर काही नावेही पुढे आली होती.
Sanjay-Dhotr-MP-BJP
Sanjay-Dhotr-MP-BJP

अकोला :  भारतीय जनता पक्षाचे अकोला लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार संजय धोत्रे यांच्या उमेदवारीबाबत उपस्थित केल्या जात असलेल्या शंकांना पूर्णविराम देत त्यांची उमेदवारी गुरुवारी जाहीर करण्यात आली.

 गेल्या काही दिवसांपासून संजय धोत्रे यांना भाजपची उमेदवारी मिळणार किंवा नाही याबाबत उलट सुलट चर्चा सुरू होती. संजय धोत्रे यांच्या जागेवर काही नावेही पुढे आली होती. त्यात प्रामुख्याने शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे अध्यक्ष व प्रसिद्ध विकासक सुरेश हावरे यांचे नाव होते. या सगळ्या शंकांना पूर्णविराम देत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्रातील 16 भाजपा उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात अकोला लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार संजय धोत्रे यांनाच उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

 खासदार संजय धोत्रे यांची उमेदवारी पक्षाने कायम ठेवल्यामुळे त्यांच्या राजकीय विरोधकांना ही मोठी चपराक मानली जात आहे. उमेदवारी जाहीर होताच खासदार संजय धोत्रे यांच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले आहे. धोत्रे यांची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे आता अकोला लोकसभा मतदारसंघात तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून अद्याप उमेदवारी जाहीर करण्यात आली नसली तरी मराठा समाजातीलच डॉक्टर अभय पाटील यांचे नाव निश्चित मानले जात आहे. त्यांची उमेदवारी जाहीर झाली तर वंचित बहुजन आघाडीचे अँँड.प्रकाश आंबेडकर हेसुद्धा अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

विरोधकांचे मनसुबे उधळले खासदार संजय धोत्रे यांना उमेदवारी मिळू नये म्हणून त्यांच्याच पक्षातील काही नेते व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपतर्फे करण्यात आलेल्या सर्वेमध्ये धोत्रे यांचे कामगिरीबाबत शासंकता व्यक्त करण्यात आल्या होत्या. मात्र त्यांनी सर्व विरोधकांचे मनसुबे उधळत उमेदवारी मिळविली आहे. हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा मोठा विजय मानला जात आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com