Fighting Between Two Leaders of Congress in Kolhapur | Sarkarnama

रॅली मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी  : कोल्हापुरातील काँग्रेस कमिटी समोरील प्रकार

सुनील पाटील
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

पेट्रोल दरवाढ आणि महागाईच्या विरोधात भारत बंद साठी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयाच्या समोरच घोषणा देण्यावरून व गाडी लावण्यावरून ही हाणामारी झाली. 

कोल्हापूर : पेट्रोल दरवाढ आणि महागाईच्या विरोधात भारत बंद साठी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयाच्या समोरच घोषणा देण्यावरून व गाडी लावण्यावरून ही हाणामारी झाली. 

काँग्रेसच्या एका नगरसेवकाच्या दुचाकीवरून आलेल्या कार्यकर्त्यांनी दुसऱ्या गटातील कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली. दरम्यान पोलीस कॉन्स्टेबल सचिन पाटील यांच्या हस्तक्षेपामुळे मार खाणाऱ्या कार्यकर्त्यांची सुटका झाली आणि हा वाद मिटला. मध्यवर्ती बस स्थानक जवळ असणाणार्या काँग्रेस कमिटीच्या कार्यालयासमोरच ही हाणामारी झाल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली. 

महागाईविरुद्ध रॅलीचे आयोजन असताना याठिकाणी झालेल्या हाणामारीने सर्वांचे लक्ष वेधले. पोलीस कॉन्स्टेबल पाटील  यांनी  यामध्ये हस्तक्षेप करत मार खाणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्याला बाजूला केले त्यानंतर हा कार्यकर्ता पुन्हा रॅली दिसला नाही.
 

संबंधित लेख