Father in law makes encroachment , daughter in law has to part with post | Sarkarnama

सासऱ्याने अतिक्रमण केले आणि सुनेचे नगरसेवकपद गेले !

सरकारनामा
रविवार, 4 नोव्हेंबर 2018

कोल्हापूर :  पन्हाळा नगरपरिषदेच्या जनसुराज्यच्या विद्यमान नगरसेविका सौ. यास्मिन उमरफारूख मुजावर यांच्या सासऱ्यांनी केलेले अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकामामुळे नगरसेवक पद रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिले.

कोल्हापूर :  पन्हाळा नगरपरिषदेच्या जनसुराज्यच्या विद्यमान नगरसेविका सौ. यास्मिन उमरफारूख मुजावर यांच्या सासऱ्यांनी केलेले अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकामामुळे नगरसेवक पद रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिले.

पन्हाळा येथील प्रभाग क्रमांक 8 मधून निवडून आलेल्या जनसुराज्यच्या विद्यमान नगरसेविका सौ. मुजावर यांचे सासरे लुकमान मुजावर यांनी शेजाऱ्यांच्या जागेत अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकाम केले.

याबाबत मुनीर मुल्ला यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यामध्ये त्यांनी सौ. मुजावर यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी केली होती. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. त्याचा निकाल जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी दिला.

 यापूर्वी याच प्रभागातील नगरसेवक हारुण मुजावर मयत झालेने एक जागा रिक्त झाली होती. हारुण मुजावर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेची पोट निवडणूक लवकरच होणार असलेची चर्चा चालू आहे.

त्याच वेळी सौ. मुजावर यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने  प्रभाग क्रमांक 8 मधून जनसुराज्यने जिंकलेल्या दोन्ही जागा रिक्त झाल्या आहेत. सौ. मुजावर या जिल्हानियोजन समितीच्या सदस्य होत्या. या निकालामुळे मुजावर यांचे ते पदही जाणार असल्याने जिल्हा नियोजन समितीचीही एक जागा रिक्त होणार आहे. तक्रारदार मुल्ला यांचे वतीने अँड. फिरोजखान पठाण यांनी बाजू मांडली.

संबंधित लेख