एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू : वडिलांनी केले दशक्रियेच्या दिवशी हेल्मेटवाटप

एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू : वडिलांनी केले दशक्रियेच्या दिवशी हेल्मेटवाटप

चाकण : अपघातात मृत्यू झालेल्या आपल्या मुलाच्या दशक्रियाविधीवेळी "हेल्मेट वापरा', असा संदेश देण्यासाठी मेदनकरवाडी (ता. खेड) येथील किरण मेदनकर यांनी उपस्थितांना हेल्मेटचे वाटप केले.

मेदनकरवाडी येथील दिग्विजय किरण मेदनकर (वय 22) या तरुणाचा मोटारसायकलवरून जाताना भोसरीजवळ अपघात झाला होता. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. तो आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता.

या अपघातावेळी त्याच्या डोक्‍यात हेल्मेट नव्हते. अशी वेळ इतरांवरही येऊ नये, यासाठी "हेल्मेट वापरा', असा संदेश देण्यासाठी त्याच्या दशक्रियाविधीवेळी त्याचे वडील किरण मेदनकर व लायन्स क्‍लब चाकण यांच्या वतीने उपस्थितांना 45 हेल्मेटचे वाटप करण्यात आले.

या वेळी लायन्स क्‍लबचे अध्यक्ष मधुकर सातव, प्रकाश मुटके, लक्ष्मण नाणेकर, विलास मांजरे, बाळासाहेब मुटके, भरत जाधव, अशोक खांडेभराड, शांताराम मेदनकर, रामदास मेदनकर, नितीन गोरे, धीरज मुटके, नंदाराम भुजबळ, डॉ. रमेश जाधव, मुक्ताजी नाणेकर, रामदास धनवटे, पांडुरंग गोरे, शंकर डोंगरे, प्रकाश मांजरे, किरण मेदनकर, हनुमंत कड आदी उपस्थित होते. या वेळी दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेटचा वापर करावा, असा संदेश देण्यात आला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com