1 जूनपासून शेतकरी जाणार पुन्हा एकदा संपावर!

राष्ट्रीय किसान महासंघाने एक ते दहा जुन पर्यंत देशव्यापी शेतकरी संपाचा इशारा दिला आहे. त्याच्या पुर्व तयारीसाठी आज हुतात्मा स्मारकात महासंघाच्या वरीष्ठ कृती सल्लागार समीतीचे सदस्य श्रीकांत तराळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात संपाचा निर्धार करण्यात आला.या देशव्यापी संपाच्या निमीत्ताने 25 मे पासुन नाशिकमध्ये धरणे आंदोलन केले जाणार आहे.
1 जूनपासून शेतकरी जाणार पुन्हा एकदा संपावर!

नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघाने एक ते दहा जुन पर्यंत देशव्यापी शेतकरी संपाचा इशारा दिला आहे. त्याच्या पुर्व तयारीसाठी आज हुतात्मा स्मारकात महासंघाच्या वरीष्ठ कृती सल्लागार समीतीचे सदस्य श्रीकांत तराळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात संपाचा निर्धार करण्यात आला.या देशव्यापी संपाच्या निमीत्ताने 25 मे पासुन नाशिकमध्ये धरणे आंदोलन केले जाणार आहे.
  
एक जुन पासुन दुध भाजीपाला मोठया शहरात जाणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल. पाच जुनला धिक्कार दिवस पाळला जाईल. सहा जुनला मंदसोर येथे गतवर्षी दिवंगत झालेल्या शेतकऱ्यांना श्रध्दांजली वाहुन सरकारचे श्राध्द घातले जाईल. 8 जुनला असहकार दिन पाळला जाईल. नऊ जुनला लाक्षणिक उपोषण केले जाईल. दहा जुनला भारत बंद पुकारला जाइल. गत वर्षी झालेल्या चुका यंदा होणार नाही.याची दक्षता घेण्याचे यावेळी ठरले. या चर्चेत डॉ. गिरीधर पाटील, शंकरराव दरेकर, प्रकाश पोहरे, संजय पाटील, प्रकाश चव्हाण, चंद्रकांत गुरव, राजाराम पाटील, गणेश निंबाळकर, रामभाऊ खुर्दळ, संजय जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. संप झाला पाहीजे, मात्र संप काळात सामान्य शेतकऱ्यांचे होणार नुकसान कसे भरुन काढणार? याचाही विचार करा असे उपस्थितांनी सुचवीाले. 

दृष्टीक्षेपात संप 
संपात 22 राज्य 130 संघटना 
शेतमाल भाजीपाला विक्री बंद 
शेतकऱ्यांची शहरातून खरेदी बंद 
6 वॉर रुम, 800स्वयंसेवकांची फळी 
110 ज्येष्ठ सदस्यांची समन्वय समीती 

या मागण्यांसाठी होतो आहे संप 
सातबार कोरा करा, उत्पादन खर्चासह अधीक 50 टक्के हमीभा, 
शेती व शेतीपुरक व्यवसायास मोफत वीज
दुधाला कमीत कमी 50 रुपये भाव
बैलगाडा शर्यंतीला कायदेशीर मान्यता  

दहा दिवस ज्या शेतक-यांना कळ सोसणे शक्य होणार नाही. त्यांचा शेतमाल नाशिकला गोल्फ क्लब येथे आणुन विकला जाईल. दुध साठ रुपये लिटर दराने विकले जाईल.
- डॉ. गिरीधर पाटील, राष्ट्रीय किसान महासंघ.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com