इंदापूरच्या शेतकरी मेळाव्यात भरणेंच्या उमेदवाराचा निकाल लागणार?

इंदापूरच्या शेतकरी मेळाव्यात भरणेंच्या उमेदवाराचा निकाल लागणार?

वालचंदनगर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये येत्या सोमवारी (ता.३०) रोजी होणाऱ्या शेतकरी मेळाव्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी कंबर कसली आहे. या मेळाव्याचा मुर्हूत साधून २०१९ च्या विधानसभा निवडणूकीसाठी शक्तीप्रदर्शनाच्या तयारीमध्ये आहेत.

इंदापूर तालुक्याचे राजकारण राज्याला ज्ञात आहे. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व आमदार दत्तात्रेय भरणे यांच्यामध्ये नेहमीच चढाओढ सुरु असते. राज्यामध्ये १५ वर्षे राष्ट्रवादी कॉग्रेस व कॉग्रेस पक्षाची युती होती. या कालावधीमध्ये कॉग्रेसच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटील यांनी कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद भूषविले. २००९ साली हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काॅग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करुन निवडणूक  लढविली. मात्र पक्षाचे अध्यक्ष पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या पारड्यामध्ये वजन टाकल्यामुळे पाटील यांचा निसटता विजय झाला व भरणे यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत कॉग्रेस व राष्ट्रवादीची युती तुटली. तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचे भरणे व कॉग्रेस पाटील यांच्यामध्ये चुरशीची निवडणूक झाली. यामध्ये भरणे यांनी पाटील यांचा दणदणीत पराभव करुन २० वर्षाची पाटील यांची सत्ता उलथवून लावली.


आता २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसची आघाडी अटळ आहे. दोन्ही पक्षाची आघाडी झाल्यास इंदापूरची जागा कोणाकडे जाणार, हे महत्वाचे आहे. पाटील हे कॉग्रेसचे पहिल्या फळतील नेते असून त्यांचा राज्याच्या राजकारणामध्ये दबदबा आहे. एके काळी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये पाटील यांचा समावेश होता. पाटील हे इंदापूरच्या जागेचा दावा करणार आहेत.

आमदार भरणे हे विद्यमान आमदार असल्याने इंदापूरच्या जागेवर ते निश्‍चित दावा करणार आहेत. २०१९ चे च्या विधानसभेचे गणिते डोळ्यासमोर ठेवून आमदार भरणे यांनी शरद पवार यांच्या शेतकरी मेळ्याचे आयोजन सोमवार (ता.३०) रोजी केले आहे.

या मेळाव्याला खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार,विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यासहित राज्यातील दिग्गज  नेते हजेरी लावणार आहेत. कार्यक्रमाला तकरी व नागरिकांनी   उपस्थिती राहावे यासाठी आमदार भरणे यांनी कंबर कसली असून एक लाख निमंत्रण पत्रिका वाटप करण्याचा कार्यक्रम सुरु आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याशी सलोख्याचे व जवळचे संबध असल्याने २०१९ च्या निवडणुकीमध्ये पवार कोणाच्या पारड्यामध्ये वजन टाकणार याकडे तालुक्याचे लक्ष लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com