farmers rallly in Anthurne in presence of Sharad Pawar | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...
हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये अंथुर्णेमध्ये  30 एप्रिल रोजी शेतकरी मेळावा

राजकुमार थोरात
रविवार, 15 एप्रिल 2018

वालचंदनगर : राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सोमवार (ता.30) रोजी अंथुर्णे (ता. इंदापूर) येथे भव्य शेतकरी मेळावा, भरणेवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसचिवालय व शाहु -फुले-आंबेडकर ग्रामआभ्यसिकेच्या इमारतीचा उद्घाटन होणार असल्याचे माहिती आमदार दत्तात्रेय भरणे यांनी दिली.

वालचंदनगर : राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सोमवार (ता.30) रोजी अंथुर्णे (ता. इंदापूर) येथे भव्य शेतकरी मेळावा, भरणेवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसचिवालय व शाहु -फुले-आंबेडकर ग्रामआभ्यसिकेच्या इमारतीचा उद्घाटन होणार असल्याचे माहिती आमदार दत्तात्रेय भरणे यांनी दिली.

भरणेवाडी येथे जिल्हा परिषद व राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुमारे सव्वातीन कोटी रुपये खर्चुन जिल्ह्यातील सर्वात मोठी व अद्ययावत ग्रामसचिवालयाच्या सुसज्ज इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. या ग्रामसचिवलयाच्या इमारतीमध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व तंटामुक्त अध्यक्षांकरिता वेगवेगळी कार्यालये बनवण्यात आली असून कार्यालयीन कामकाजाकरिता स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या महिला व पुरुष सदस्यांकरिता वेगवेगळा बैठक कक्ष उभारण्यात आला आहे.

ग्रामसचिवालयामध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठी प्रतिक्षालय बनवण्यात आला असून बाहेरगावाहून येणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी विश्रामगृहाची सोय करण्यात आली आहे. गावातील युवकांना व्यायाम करता येण्यासाठी सुसज्ज व्यायमशाळा उभारण्यात आली असून येथे शाहु -फुले-आंबेडकर ग्रामआभ्यसिकेच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

या दोन्ही इमारतीचा उद्घाटन माजी केंद्रिय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते सोमवार(ता.30) रोजी करण्यात येणार आहे. तसेच यावेळी भव्य शेतकरी मेळावा आयोजित केला असून पवार मार्गदर्शन करणार आहेत.

संबंधित लेख