farmers gets shocked after onion rates | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

कांद्याची `पट्टी` पाहून शेतकऱ्याला धक्का! ८१५ किलोला मिळाले ७४ रूपये

डी. के. वळसे पाटील
सोमवार, 31 डिसेंबर 2018

मंचर : आंबेगाव तालुक्‍यातील शिंगवे येथील शेतकरी सुनील निवृत्ती वाव्हळ यांनी चौदा पिशव्यामधून 815 किलो कांदा विक्रीसाठी गुलटेकडी -पुणे येथे पाठविला. त्यांना एकूण 807 रुपये मिळाल्याचे व त्यातून 733 रुपये खर्च झाल्याने 74 रुपये शिल्लक राहिल्याचे पट्टीमध्ये नमूद केले आहे.

या पिकासाठी त्यांचा खते, औषधे, बियाणे, मजुरी व बारदान असा एकूण आठ हजार रुपये खर्च झाला होता. पट्टी हातात पडल्यानंतर त्यांना मानसिक धक्काच बसला. 

""कांद्याच्या बाजारभावात अजिबात परवडत नाही. गेली तीन वर्ष कांदा पीक तोट्यात गेले आहे. विक्रीला कांदा पुण्याला पाठविण्याऐवजी त्याचे खत केले असते. तर 74 रुपया पेक्षा अधिक रक्कम मिळाली असती. दहा किलो कांद्याला दहा ते बारा रुपये बाजारभाव मिळाला. राज्य व केंद्र सरकारने पाकिस्तानमधून कांदा आयात केला. देशातील कांदा निर्यात बंद केली. त्यामुळे त्याचा फटका कांदा उत्पादकांना बसला आहे. कांदा निर्यात केल्यानंतरच बाजारभावात वाढ होईल.'' असे वाव्हळ यांनी सांगितले. 
 
संबंधित लेख