Farmers confirm strike from 1 June  | Sarkarnama

संपावर जाणारच, शेतकऱ्यांचा निर्धार कायम

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 17 मे 2017

हे आहेत ठराव

- 1 जुनपासून शेतकरी संपावर जाणार
- कर्जमाफीच्या निर्णयाशिवाय सरकारशी चर्चा नाही
- पहिल्या टप्प्यात शहरांचा दुध, भाजीपाला, ठिकठिकाणचे बाजार बंद करणार

औरंगाबाद ः शेतकऱ्यांच्या नियोजित संपात सरकारने कितीही फूट पाडण्याचा प्रयत्न केला तरी 1 जूनपासून संपावर जाणारच असा निर्धार शेतकऱ्यांनी औरंगाबादेत आयोजित राज्यव्यापी बैठकीत केला.

किसान क्रांती संघटनेच्यावतीने (बुधवार ता. 17) आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत राज्याच्या वीस जिल्ह्यातील शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व विधीज्ञ
उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, सरकारकडून कर्जमाफीच्या निर्णया बाबतकेली जाणारी चालढकल, शेतकऱ्यांच्या मालाला मिळणारा हमी भाव यासह विविध प्रश्‍नांवर सरकारला जाग करून हाबाडा देण्यासाठी येत्या 1 जूनपासून संपावर जाण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.

यापुर्वी पुण्यात 10 मेरोजी शेतकरी संघटनांची पहिली राज्यव्यापी बैठक घेण्यात आली होती.त्यानंतर नगर जिल्ह्यातील पुणतांबा येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत कर्जमाफी, मालाला उत्पादन खर्चावर आधारीत दीडपट नफा मिळवून देणारा भाव आदी विषयांवर चर्चा झाली होती. त्याचवेळी 1 जूनच्या संपा बाबत
शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या संपाचा आराखडा व निजोजन ठरवण्यासाठीच आजची बैठक औरंगाबादेत घेण्यात आली.

पुणतांब्याचे प्रतिनिधीही हजर

ज्या नगर जिल्ह्यातील पुणतांब्याच्या शेतकऱ्यांची बैठक घेऊन
मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा संप रद्द झाल्याची घोषणा करायला लावली त्याच पुणतांबा येथील किसान क्रांतीचे सहा पदाधिकारी या बैठकीला हजर होते. मुख्यंमत्र्यांना बैठक घ्यायची होती तर 40 गावच्या प्रत्येकी एका व्यक्‍तीला तरी बैठकीत सहभागी करून घ्यायला हवे होते.

त्यामुळे संपावर जाण्याचा आमचा निर्धार कायम असल्याचे पुणतांबा येथील अशोक धनवटे, धनंजय
जाधव, सुधाकर जाधव, गणपतराव वाघ, प्रा. एस. आर. बखळे, सर्जेराव जाधवआदींनी सांगितले. बैठकीला औरंगाबाद, जालना, बीड, नाशिक, सोलापूर, पूणे, सातारा, कोल्हापूर, जळगाव, बुलडाणा, नगर, वाशीमसह वीस जिल्ह्यातील शेतकरी, सामाजिक संघटना, विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

यावेळी तीन प्रमुख ठरावासह काही व्यक्‍तींचा राज्य समन्वय समितीमध्ये समावेश करण्यात आल्याचे किसान क्रांतीचे राज्य समन्वयक जयाजीराव सुर्यवंशी यांनी सांगितले.

संबंधित लेख