Farmers are agitating and Udhhav Thakrey is holidaying - Narayan Rane | Sarkarnama

महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर तळमळतोय आणि उद्धव परदेशात थंड हवेत पर्यटन करताहेत  -राणे 

सुचिता रहाटे : सरकारनामा 
गुरुवार, 8 जून 2017

मुंबई: "रोम शहर जळत असताना रोम शहराचा राजा निरो फ्युडल वाजवत आपला शौक पुर्ण करत होता. तसं इथे महाराष्ट्रातला शेतकरी संकटात आहे  आणि उद्धव ठाकरे परदेशात आहेत .   उद्धव परदेशातील थंड हवेचा मागील दहा  दिवस आस्वाद घेत महाराष्ट्रातील संपकरी शेतकऱ्यांना पाठिंबा देत आहेत."  अशा शब्दांत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागली.

 'सरकारनामा'शी बोलतानानारायण राणे म्हणाले , " शिवसैनिक रस्त्यावर आणि पक्षप्रमुख परदेशात हे आता नेहमीच  आहे. नंतर श्रेय घ्यायला उद्धव ठाकरे येतील. आंदोलनाच्या निर्णायक क्षणी उद्धव ठाकरे गायब असतात हा अनुभव मला आहे. काही वर्षांपूर्वी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात आंदोलक पोलीसांच्या लाठ्या खात असताना उद्धव ठाकरे मध्यप्रदेशातल्या कान्हा अभयारण्यात फोटोग्राफीमध्ये मश्गूल होते.आताही तसंच झालंय. "

" शेतकऱ्यांचे आंदोलन निर्णायक टप्प्यावर असताना उद्धव ठाकरे पुन्हा सहकुटुंब परदेशात आहेत. आज महाराष्ट्रातील शेतकरी हैराण आहे . संतापलेला आहे . शेतकऱ्यांबाबत उद्धव ठाकरेंना इतकाच  कळवळा असेल, तर ते सुटी संपवून परत का येत नाहीत? शिवसेनेचे मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांची सुटी संपण्याची वाट पाहायची की, उध्दव व्हिडिओ कॉन्फरन्स वैगरे करून मार्गदर्शन करणार आहेत? असे भाबडे प्रश्न महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पडत आहेत."  असेही नारायण राणे यांनी सांगितले.

संबंधित लेख