महाराष्ट्रातील बळीराजा रस्त्यावर, 'बंद'ला उत्स्फूर्त प्रतिसाद

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुकारलेल्या आजच्या "महाराष्ट्र बंद' उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. विविध ठिकाण शेतकरी रस्त्यावर उतरला असून बाजारपेठा, वाहतूक बंद आहेत. पुण्यासह नगर, नाशिक, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, हिंगोली, परभणी, अकोला, सोलापूर आदी ठिकाणी या बंदची तीव्रता अधिक आहे.
महाराष्ट्रातील बळीराजा रस्त्यावर, 'बंद'ला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुकारलेल्या आजच्या "महाराष्ट्र बंद' उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. विविध ठिकाण शेतकरी रस्त्यावर उतरला असून बाजारपेठा, वाहतूक बंद आहेत. पुण्यासह नगर, नाशिक, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, हिंगोली, परभणी, अकोला, सोलापूर आदी ठिकाणी या बंदची तीव्रता अधिक आहे. तळेगावात टोल नाका पेटवण्यात आला. अकोल्यात शेतकरी संघटनेच्या दोनशे कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. शिवसेनेचे नगर जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. कोल्हापूर, सातारा आणि सांगलीहून पोलिस बंदोबस्तात दुधाचे टॅंकर मुंबईकडे रवाना करण्यात आले आहेत. 

नाशिक 
शेतकरी आंदोलनाच्या पाचव्या दिवशी आज जिल्ह्यात महाराष्ट्र बंदला प्रतिसाद मिळाला. गावोगावी बाजारपेठा तसेच बाजार समित्या आणि दूध संकलन बंद ठेऊन शेतकऱ्यांनी बंदला चोख सुरवात केली. यामध्ये ठिकठिकाणी राज्य शासन, मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमांचे दहन व अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यामुळे गुजरात, मुंबईसह देशातील विविध बाजरपेठांत जाणारा भाजीपाला निर्यात ठप्प झाली. 

आज महाराष्ट्र बंदला ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळाला, शहरातही विविध दुकाने बंद होती. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व सतरा बाजर समित्या व त्यांच्या उप बाजार आवारांवरील आवक ठप्प झाली आहे. शेतकऱ्यांच्या उस्फूर्त प्रतिसादाने बंदचा मोठा पिरणाम दिसून आला. सरसकट कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव यांसाठी सुुर झालेल्या या ांदोलनाची सूत्रे आता नाशिकमधून हलविले जात आहेत. त्यामुळे काल येथे झालेल्या मेळाव्यानंतर राज्यातील संपाची दिशा ठरविण्यासाठी राज्यभरातील संघटनांचे प्रतिनिधी, नेत्यांशी संपर्क साधला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर दोन हजारांहून अधिक मोठा पोलिस बंदोबस्त आहे. राज्य राखीव दलाच्या तीन तुकड्या, दंगाविरोधी पथकही सज्ज ठेवण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक अंकुश शिंदे हे यासंदर्भात राज्याच्या गृह विभागाच्या संपर्कात आहेत. 

निमगाव मढ (ता. येवला), भालुर (ता. नांदगाव) येथे शेतकऱ्यांनी गावात फेरी काढून बंदचे अवाहन केले. गावात बंद पाळण्यात आला. नांदूरमधमेश्‍वर (ता. निफाड) रस्त्यावर ट्रक आडवा करुन रस्ता बंद करीत आंदोलन केले. कोकणगाव फाटा येथे साकोरा, शिरसगाव, वडाळीनजीक तसेच पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी आंदोलनात भाग घेऊन बंदचे आवाहन केले. त्यानंतर पोलिस निरिक्षक देसले यांना निवेदन देण्यात आले. वनसगाव येथे शेतकऱ्यांनी रस्त्यावर टाळ मृदुंगासह भजन केले. घोटी (ता. ईगतपूरी) येथेही आंदोलन झाले. व्यापारी पेठे बंद पाळण्यात आला. 

नगर 
टाकळीकाझी येथे रविवारी मध्यरात्री शेतकऱ्यांनी दुधाचे टॅंकर अडविले. पिलोसांनी शेतकऱ्यांवर लाठीहल्ला केला असता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे तेथे आले. पोलिसांनी गाडे यांना अकट केली. तसेच शेतकऱ्यांच्या मदतीला आलेले जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. नगर पंचायत समितीच्या उपसभापतींचे पुत्र प्रवीण कोकाटे यांच्या गाडीचा पोलिसांनी पाठलाग केला. पोलिसांची रायफलही कोकाटे यांच्या काचेत अडकली होती. या प्रकाराचे फोटो काढत असणाऱ्या एका फोटोग्राफरला पोलिसांनी चोप देऊन दिला. आंदोलकांनी रात्री पांढरीपुलजवळ एक दुधाचा टॅंकर खाली करून पेटवून दिला. महाराष्ट्र बंदमुळे जिल्ह्यात आंदोलने अधिक पेटू लागली आहेत. नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीला सकाळीच टाळे लावण्यात आले. आज पहाटेपासूनच रस्त्यारस्त्यात शेतकऱ्यांचे टोळके दिसून येत होते. 

अकोला 
अकोला: व्याळा, घुसर, वाडेगांव येथे रास्ता रोको आंदोलन तीव्र. व्याळा येथ शेतकरी जागरमंच व इतर संघटनेच्या कार्यकत्यांसह शेतकय्‌ांना अटक. घुसर येथेही कार्यकर्ते, शेतकय्‌ांना अटक करण्यात आली. जिल्ह्यातील इकर तालुक्‍यांमध्येही आंदोलन पेटले. 

सांगली
सांगली : जिल्ह्याच्या ग्रामीणभागात बंदला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. तासगाव तालुक्‍यात गौरगाव फाटा येथे दुधाची गाडी अडवून कॅन ओतण्यात आले. मणेराजुरीत मुख्यमंत्री व कृषी राज्यमंत्र्यांचे प्रतिकात्मक पुतळे जाळून निषेध करण्यात आला. इस्लामपूर, कडेगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यात उत्स्फूर्त बंद आहे. बंद दरम्यान कोठेही हिंसक घटना नसून सर्वत्र शांततेत आंदोलने सुरू आहेत. 

कोल्हापूर 
बाजारसमिती ठप्प, मालाची आवक नाही, अनेक ठिकाणी एसटी वाहतूकही बंद आहे. शेतकरी संघटेननं भाजीपाला उधळला. बाजार समितीत संघटनेचे आंदोलन केले. बाजार समितीत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. चांदेकरवाडी (ता. राधानगरी) येथे वाहने अडवली. बेलवळे, बाचणी, वडकशिवाले येथे रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यातील सात दूध संघातून मुंबईकडे टॅंकर रवाना. एकूण 27 दुधाचे टॅंकर असून पोलिसांच्या पाच वाहनांची सुरक्षा त्यांना देण्यात आलीये. मुंबईसह नवी मुंबई आणि अन्य भागात हे दूध दुपार पर्यंत पोहचविण्यात येणार आहे. 

सातारा  
महाराष्ट्र बंदला सातारा जिल्ह्यातून प्रतिसाद मिळत आहे. सातारा शहरातील बाजारपेठ पुर्णत: बंद आहे. मार्केट यार्ड तसेच तिन्ही प्रमुख भाजी मंडईत शुकशुकाट आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना व संयुक्त कामगार समितीने सातारा शहरात मोर्चा कडून दुकानदारांना दूध देऊन संपात सहभागी होण्यासाठी गांधीगिरी आंदोलन केले. तसेच पोवईनाका येथे ठिय्या आंदोलन केले. 
यामध्ये शेतकरी कामगार कृती समिती, स्वाभिमानी शेतकरी संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. 

औरंगाबाद 
औरंगाबाद बाजार समितीत आवकवर परिणाम झाला आहे. भाजीपाल्याची फक्त 25 टक्के आवक झाली. बाजार समितीत कॉंग्रेस, मराठा संघटनांनी केले बंदचे आवाहन केले आहे. 

सोलापूर 
सोलापूर जिल्ह्यात कडकडीत बंद सुरू आहे. कुर्डूवाडी, माढा, करमाळा, सांगोला, मंगळवेढा, बार्शी यांसह सर्वच तालूक्‍यातील ग्रामीण भागात बंद सुरू आहे. बाजार समित्याही बंद आहेत. 

पुणे 
बारामती इंदापुर राज्यमार्गावर शेतकऱ्यांनी राडा केला. भाजीपाल्याच्या गाड्या अडवून शेतमाल रस्त्यावर फेकला. 

हिंगोली, परभणी, पालममध्ये बंदला ऊत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत बंदला पाठिंबा दिला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com