farmer vidhansabha | Sarkarnama

शेतकरी प्रश्नी विरोधक वेलमध्ये ; विधानसभा दोनवेळा तहकूब 

ब्रह्मा चट्टे 
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

मुंबई : विधानसभेच्या कामकाजाची आज सुरवात होताच विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. शेतकरी कर्जमाफी आणि बोंडआळी संबंधी सरकारविरोधी घोषणा देत विरोधक वेलमध्ये उतरले होते. त्यामुळे प्रश्नोत्तराचा तास रद्द करून चर्चा सुरू करण्यात आली. मात्र, कोणाच्या प्रस्तावावर चर्चा करायची याबाबत दुमत झाल्याने पुन्हा गोंधळ करत विरोधक वेलमध्ये उतरले. त्यामुळे विधानसभा दहा मिनीटांसाठी व पुन्हा 15 मिनीटांसाठी तहकूब करण्यात आली. 

आज अर्थसंकल्पिय अधिवेशाच्या तिसऱ्या दिवशी कामकाजाला सुरवात होताच विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील नियम 57 अन्वये आणि 97 अन्वये बोलायला उभे राहिले.

विखे पाटील म्हणाले, "" शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल सतत्याने चर्चेला मुद्दा आहे. बोंडआळी आणि गारपीठाने झालेल्या नुकसानीबाबत सरकारकडून कोणतीही हलचाल होत नाही. याबाबत राज्यात असंतोष आहे. त्यामुळे या प्रश्नावर आम्ही प्रस्ताव दाखल केला आहे. प्रश्नोत्तरे बाजूला ठेवून चर्चा करावी." 

विरोधकांच्या या मागणीस नकार देत विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी चर्चेला नकार दिल्याने विरोधक आक्रमक झाले. शेतकरी कर्जमाफी आणि बोंडआळी संबंधी सरकारविरोधी घोषणा देत विरोधक वेलमध्ये उतरले होते. ' झालीच पाहिजे झालीच पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, नही चलेंगी वही चलेगी दादागिरी नही चलेगी, सेना भाजप सरकारचा धिक्कार असो, भाजप सरकार हाय हाय, शिवसेना सरकार हाय हाय, शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, या सरकारचे करायचे काय खाली डोकं वर पाय, विरोधकांचा आवाज दाबणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत विरोधक वेलमध्ये उतरले होते. यावेळी प्रश्नोत्तरे सुरूच होता. विरोधक मात्र गोंधळ घालतच होते. 

त्यावेळी हरकतीचा मुद्दा घेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, " आपण राज्य शासनाचा 23 फेब्रुवारीचा जीआर पहा. राज्य सरकारने काय आश्वासन दिले होते ते बघा. त्या जीआरवर विधानसभेत चर्चा करावी अशी आमची मागणी आहे." 

त्यावर अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले, " प्रश्नोत्तराचा तास थांबवून चर्चा सुरू करायचा असेल तर सुरू करा, " विरोधकांचा गोंधळ वाढल्याने प्रश्नोत्तराचा तास रद्द करून चर्चेला सुरवात करण्यात आली. 

भाजप आमदार अनिल बोंडे यांनी नियम 293 अन्वये बोंडआळी व गारपिठीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी प्रस्तावाचे वाचन सुरू केले. मात्र नियम 57 अन्वये आम्ही दाखल केलेल्या प्रस्तावावर चर्चा करा. राज्य सरकारच्या जीआरवर चर्चा करा अशी मागणी विरोधकांनी केली.

कोणाच्या प्रस्तावावर चर्चा करायची याबाबत दुमत झाल्याने पुन्हा गोंधळ करत विरोधक वेलमध्ये उतरले. त्यामुळे विधानसभा दहा मिनीटांसाठी तहकूब करण्यात आली. त्यानंतर कामकाज पुन्हा सुरू झाले. विरोधक आक्रमक असल्याने दुसऱ्यांदा कामकाज 15 मिनीटांसाठी तहकूब करण्यात आले. 

संबंधित लेख