उत्तरप्रदेशचा 'फॉर्म्युला'  शिवसेनेला मान्य नाही : संजय राऊत 

उत्तरप्रदेशचा 'फॉर्म्युला'  शिवसेनेला मान्य नाही : संजय राऊत 

मुंबई : नुकतेच सरकारने शेतकऱ्यांना अंशतः कर्जमाफीचा दिलासा दिला असला तरीही शेतकऱ्यांना काही नियम व अटी घालून दिल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. उत्तरप्रदेशचा फॉर्म्युला आम्हाला मान्य नसून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. यावर शिवसेना ठाम असल्याची भूमिका खासदार संजय राऊत यांनी 'सरकारनामा' शी बोलताना मांडली. 

पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि आपल्या व्यथा त्यांच्या समोर मांडल्या. शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भात अनेक अडचणी असल्याची बाब समोर आली. या अडचणींवर गांभीर्याने विचार करणार असल्याचे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिले. आज राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील व सहकार मंत्री सुभाष देशमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. त्यावेळी शेतकऱ्यांच्या बाजूने त्यांना येणाऱ्या अडचणी उद्धव ठाकरे या दोघांसमोर मांडतील. अशी माहिती राऊत यांनी दिली. 

काल शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना कर्जमाफीच्या निर्णयाबाबत अभिनंदन केले. तरीही या शेतकऱ्यांना कर्जमाफी बाबत शंका असल्याचे उद्धव यांना बोलून दाखविली. चंद्रकांत पाटील यांनी कर्जमाफी बाबत निकष घालून दिले आहेत. त्यावर शेतकरी वर्ग खुश नाहीत असेही त्यांनी सांगितले. आमच्या घरातील माणूस जर शिपाई असेल तर आम्हाला कर्जमाफी मिळणार नाही का ? आमची जमीन एकर पेक्षा जास्त असेल तर कर्जमाफी देणार नाही का ? असे प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केले. या संदर्भात आज उद्धव ठाकरे चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करतील. तसेच कर्जमाफीचे स्वरूप काय असेल. याचा तपशील उद्धव ठाकरे घेणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com