farmer strike | Sarkarnama

शेतकरी संपामुळे मंत्र्यांची  मतदार संघाकडे पाठ 

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 10 जून 2017

मुंबई : कर्जमाफी व शेतीमालाच्या हमीभावासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. 1 जून पासून सुरू झालेल्या संपाला आज दहा दिवस होतील. शेतकरी संपामुळे महाराष्ट्रातले वातावरण अधिक तापले असून राज्यातील मंत्र्यांनी आपापल्या मतदार संघाकडे पाठ फिरवली आहे. 

मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुंबईत आलेले मंत्री एक-दोन दिवस थांबून गावचा रस्ता धरतात. परंतु शेतकरी संपामुळे आपापल्या मतदार संघातील शेतकऱ्यांचा रोष नको. या भीतीने बहुतेक मंत्री मुंबईतच ठाण मांडून बसले आहेत. 

कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर व सदाभाऊ खोत हे आपापल्या मतदार संघात गेल्या अनेक दिवसांत फिरकलेच नाहीत. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही मुंबईत वास्तव्य करणे पसंत केले असून शनिवारी वाढदिवसाच्या निमित्ताने शुक्रवारी रात्री उशिरा मुंबईहुन आपल्या गावी गेले. 

जलसंधारण मंत्री राम शिंदे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, आदिवासी मंत्री विष्णू सावरा हेदेखील मुंबईतुन आपल्या कामाची जबाबदारी पार पाडत आहेत. शेतकऱ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी हा संप अधिकाधिक तीव्र करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे शेतकरी असो वा विरोधी पक्ष सगळ्यांनीच शेतकरी मुद्यांवर सरकारला धारेवर धरले आहे. 

राज्यातील अनेक मंत्री सोमवारी सायंकाळपर्यंत मुंबईत पोहचून मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावतात. बुधवारी दुपारनंतर अनेकजण आपापल्या मतदारसंघात जायला निघाले असतात. अनेक मंत्री तर घरी बसूनच काम करण्यास पसंती देतात. दोन ते तीन दिवसाच्यावर कोणीही मंत्री मंत्रालयात थांबायला तयार नसतात. तसेच अधिकाऱ्यांना आपल्या बंगल्यावर बोलवून काम करतात. त्यामुळे अनेक मंत्री आपापल्या मतदार संघात जाणे पसंत करतो. परंतु शेतकरी संपामुळे अनेक मंत्री आपल्या मतदार संघात न जाता मंत्रालयातून काम करीत आहेत. 

संबंधित लेख