farmer strike | Sarkarnama

राधाकृष्ण विखेंवर टीका करणाऱ्यांनी  शेतकऱ्यांसाठी काय केले ? सुजय विखे 

सरकारनामा ब्युरो 
रविवार, 4 जून 2017

नगर : विधानसभेतील विरोधी पक्षनेतेविरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पायाला दुखापत झाल्याने ते शेतकऱ्यांच्या आंदोलनांत सक्रियपणे सहभागी होऊ शकले नाहीत. वस्तुस्थिती लक्षात न घेता त्यांच्यावर टीका केली जात आहे. जे टीका करतात त्यांनी शेतकऱ्यांसाठी कोणते योगदान दिले आहे असा सवाल सुजय विखे-पाटील यांनी आज केला. 

नगर : विधानसभेतील विरोधी पक्षनेतेविरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पायाला दुखापत झाल्याने ते शेतकऱ्यांच्या आंदोलनांत सक्रियपणे सहभागी होऊ शकले नाहीत. वस्तुस्थिती लक्षात न घेता त्यांच्यावर टीका केली जात आहे. जे टीका करतात त्यांनी शेतकऱ्यांसाठी कोणते योगदान दिले आहे असा सवाल सुजय विखे-पाटील यांनी आज केला. 
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना दत्तक घेण्याबाबत बोलविलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेल्या तीन दिवसापासून राज्यात शेतकरी संपावर आहेत. हा संप चिघळल्याने सरकार विरोधात शेतकरी, विरोधीपक्ष असा सामना रंगला आहे. या सर्व घडामोडी राधाकृष्ण विखेंचे कोठे दर्शन झाली नाही अशी शंका उपस्थितीत करीत काही जणांनी टीका केली आहे. या टीकेला सुजय यांनी आज उत्तर दिले. 

ते म्हणाले, "" शेतकरी कर्जमाफी व हमीभावाच्या प्रत्येक आंदोलनाला आपला पाठिंबा आहे. कॉंग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी 27 जिल्ह्यात काढलेल्या संघर्ष यात्रेमुळे या सरकारचे शेतकरी विरोधी धोरण चव्हाट्यावर आले आणि त्यातूनच शेतकऱ्यांचा संतापाचा उद्रेक होऊन आज राज्यभर आंदोलने होताना दिसत आहेत.'' 

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पायाला दुखापत झाल्याने ते या आंदोलनांमध्ये सक्रियपणे सहभागी होऊ शकले नाहीत. मागील आठवड्यापासून ते उपचार घेत आहेत. डॉक्‍टरांनी त्यांना 15 दिवसांची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. संघर्ष यात्रेचा चौथ्या टप्प्यात त्यांना ही दुखापत झाली होती. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केल्याने ती गंभीर होण्याची शक्‍यता होती. त्यामुळे विश्रांती घेणे अनिवार्य झाले होते, या शब्दांत त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अनुपस्थितीबाबतच्या चर्चेला पूर्णविराम दिला. 

वस्तुस्थिती जाणून न घेता विरोधी पक्षनेत्यांवर चिखलफेक करणाऱ्यांचा त्यांनी समाचार घेतला. विखे पाटील कुटुंबांच्या राजकारणाचा आणि समाजकारणाचा शेतकरी हाच केंद्रबिंदू राहिला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्री असताना प्रामाणिकपणे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी आजवरच्या प्रत्येक अधिवेशनात आक्रमकपणे कर्जमाफीची मागणी लावून धरली. शेतकऱ्यांच्या अनेक आंदोलनात ते सहभागी झाले. या पश्‍चातही त्यांच्यावर विनाकारण बिनबुडाची टीका करणाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी कोणते योगदान दिले? असा सवालही सुजय विखे पाटील यांनी शेवटी केला. 

संबंधित लेख