farmer strike | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

नगर जिल्ह्यात दूध ओतले, आठवडे बाजार बंद, भाजीबाजार थंडावला

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 1 जून 2017

नगर : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून सुरू केलेल्या संपास नगर जिल्ह्यातून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. आज पहाटेपासूनच शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईला जाणारा भाजीपाला व दुधाचे टॅंकर अडविले. अनेक ठिकाणी दूध रस्त्यावर ओतून दिले. सर्व आठवडे बाजार बंद झाले, तर बाजार समितीत शुकशुकाट जाणवला. तुरळक ठिकाणी असलेल्या भाज्यांच्या स्टॉलवर भाज्यांचे दर मात्र दुप्पट-तिप्पट झाले. 

शेतकरी संपाचे मुख्य केंद्रबिंदू असलेल्या पुणतांबे (ता. कोपरगाव) येथे दूध रस्त्यावर ओतून कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध केला. नगर-कल्याण रोडवर आज पहाटेच टाकळी ढोकेश्‍वर (ता. पारनेर) परिसरात दूध व शेतीमाल घेऊन जाणाऱ्या गाड्या शेतकरी कार्यकर्त्यांनी अडविल्या. निघोजमध्येही टॅंकर अडवून दूध रस्त्यावर सोडून देण्यात आले. श्रीरामपूर तालुक्‍यातील माळवाडी येथील आठवडेबाजार उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात आला. बाजार समितीसमोर फळे घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या काचा फोडण्यात आल्या. दूध घेऊन जाणारे वाहने अडविण्यात आले. 

नगर शहरात भाज्यांचे दर कडाडले 
नगर शहरात येणारा भाजीपाला अडविण्यात आला. तरीही बाजार समितीत किरकोळ विक्रेत्यांनी भाजीपाला आणला होता. रोजच्या आवकेच्या सत्तर टक्के कमी भाजीपाला आणला होता. त्यामुळे दर दुप्पट व तिप्पट झाले. कोथिंबीर 30 रुपये जुडी, गवार 100 रुपये, टोमॅटो 60 रुपये किलो, मेथीची जुडी 30 रुपये अशा पद्धतीने सर्वच भाज्यांचे दर दुप्पटीपेक्षा जास्त झाले आहेत. नगर तालुक्‍यातील मेहकरी, कापूरवाडी, दहिगाव साकत, खडकी, टाकळी खातगाव, देहेरे आदी ठिकाणी दूध रस्त्यावर ओतून निषेध नोंदविला. 

संबंधित लेख