farmer pension, mumbai | Sarkarnama

""आत्महत्या रोखण्यासाठी  शेतकऱ्यांना पेन्शन द्या'' 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 29 जून 2017

मुंबई : सरकारने शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी त्यांना जगण्याची हमी देणे आवश्‍यक आहे. यासाठी अल्पभूधारक ज्येष्ठ शेतकरी-शेतमजूरांना (साठ वर्षे पूर्ण) मासिक पाच ते दहा हजार रूपये सुरक्षा योजनेचे कवच द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुरेश माने यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

मुंबई : सरकारने शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी त्यांना जगण्याची हमी देणे आवश्‍यक आहे. यासाठी अल्पभूधारक ज्येष्ठ शेतकरी-शेतमजूरांना (साठ वर्षे पूर्ण) मासिक पाच ते दहा हजार रूपये सुरक्षा योजनेचे कवच द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुरेश माने यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

सरकारकडून राज्यात शेतीच्या क्षेत्रात कोणत्याही नियोजनाशिवाय करण्यात येणाऱ्या गुंतवणुकीलाही डॉ. माने यांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. कर्जमाफीच्या प्रश्नावर राज्यातील लाखो शेतकऱ्यांची फसवणूक केलेल्या राज्य सरकारकडून शेतीच्या क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू असून विविध मार्गाने राज्यातील शेती विकासाच्या नावाखाली ठराविक भांडवलदार आणि उद्योगपतींना देण्याचा घाट घातला जात आहे. शेतीतील गुंतवणूक म्हणजे केवळ जमिनी हडप करण्याचा डाव असून त्यासाठी शेती विकासाचे कोणतेही नियोजन सरकारकडे नाही, यामुळे अशा नियोजनाशिवाय गुंतवणुकीची अंमलबजावणी सुरू झाल्यास राज्यातील लाखो शेतकरी कायमस्वरूपी उद्‌वस्त होतील अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. 

सरकारला राज्यातील हजारोंच्या संख्येने होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात कोणताही रस नाही, मागील सरकारप्रमाणे हे सरकारही शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष आहे. यामुळेच राज्यातील शेतकरी, कष्टकरी दिवसेंदिवस अडचणीत सापडला आहे. यासाठी सरकारने जमीन वाटपाचा कार्यक्रम शेतीतील गुंतवणूक ही नियोजनबद्ध करावी आणि मात्र त्यापूर्वी स्वामिनाथन आयोगाच्या संपूर्ण शिफारशींची अंमलजबाजवणी करावी, व राज्यातील प्रत्येक अल्पभूधारक शेतकरी-शेतमजूरांना मासिक आर्थिक सुरक्षा कवच द्यावे, त्यामुळे राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखल्या जातील असे डॉ. माने यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.  

संबंधित लेख