farmer loan nawab malik news | Sarkarnama

कर्जमाफीवरून फडणवीस-दानवेंची जुमलाबाजी : नवाब मलिक 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 89 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल असे सांगितले होते. मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे सांगतात की, केवळ 46 हजार कोटींची कर्जमाफी होणार आहे. यात नेमकी आकडेवारी खरी कोणाची आहे, असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. 

राज्यातील जनतेपुढे पडला आहे. या आकडेवारीच्या खेळात मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष हे पंतप्रधान मोदी यांच्यासारखे खोटी आकडेवारी सांगतात त्याचप्रमाणे राज्यातील भाजपचे नेतेही आकड्यांची जुमलाबाजी करत असल्याची टीका त्यांनी केली. 

एकूण किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाला आणि किती हजार कोटींची कर्जमाफी झाली याची माहिती मिळावी यासाठी सरकारने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी करताना ते म्हणाले, की राष्ट्रवादी कॉंग्रेसने कर्जमाफीची मागणी करताना शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याची मागणी केली होती. संघर्ष यात्रा आणि शेतकऱ्यांच्या संपानंतर सरकारने कर्जमाफी केली. परंतु अजूनही पैसे देण्याचे काम सुरु झाले नाही. ऑनलाईन मुदतीच्या शेवटच्या दिवशी फक्त 56 लाख आले आहेत. 89 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असे मुख्यमंत्री सांगत होते. मग उरलेले शेतकरी कुठे गेले? सहकार मंत्री सुभाष देशमुख म्हणतात की 12 लाख शेतकरी असे आहेत ज्यांना कर्जमाफीचा लाभ घ्यायचा नाही. सरकारने या 12 लाख दानशूर शेतकऱ्यांची नावे जाहीर करावीत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ग्रामपंचायतीमध्ये या शेतकऱ्यांचा सत्कार आयोजित करेल. त्यामुळे त्यांची यादी सादर करावी, अशी मागणी मलिक यांनी केली. 

शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम वेळेत न दिल्याच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसने 1 ऑक्‍टोबर रोजी आंदोलन पुकारले आहे. पण 1 तारखेला मोहरमचा सण असल्यामुळे हे आंदोलन 1 ते 7 ऑक्‍टोबर दरम्यान राज्यभरात केले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. 

संबंधित लेख