शेतकरी कर्जमाफीसाठी खुल्या बाजारातून कर्ज

शेतकरी कर्जमाफीसाठी खुल्या बाजारातून कर्ज

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी देण्यासाठी खुल्या बाजारातून तब्बल 20 हजार कोटींच्या कर्ज उभारणीसाठी केंद्र सरकारने परवानगी दिली असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
 
शेतकरी कर्जमाफीसाठी सुमारे 34 हजार 22 कोटींच्या निधीची आवश्‍यकता आहे. त्यापैकी सुमारे 20 हजार कोटींची रक्कम खुल्या बाजारातून कर्जाच्या रूपात उभारण्यास परवानगी देण्याची विनंती राज्य सरकारकडून केंद्राकडे करण्यात आली होती. राज्य सरकारच्या या मागणीला केंद्राकडून परवानगी मिळाल्याची माहिती मुनगंटीवार यांनी लेखी उत्तरात दिली आहे. भाजप सदस्य अपूर्व हिरे आणि अनिल सोले यांनी याबाबतचा तारांकित प्रश्‍न विचारला होता. 

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी भरलेल्या ऑनलाइन अर्जातील माहिती आणि बॅंकांकडील माहिती यांची सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ताळमेळ घालून पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात येत आहे. यादीच्या आधारे कर्जमाफी किंवा प्रोत्साहनापोटी रकमा बॅंकांना पाठविण्यात येत आहेत. आतापर्यंत 31 लाख 33 हजार शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांमध्ये योजनेंतर्गत कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित पात्र अर्जदार शेतकऱ्यांना लाभ देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे मुनगंटीवार यांनी आपल्या लेखी उत्तरात सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com