farmer loan devendra fadanvise | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

कर्जमाफीचे पैसे 18 ऑक्‍टोबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यात : फडणवीस 

सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद ः राज्यातील शेतकऱ्यांना जाहीर झालेल्या कर्जमाफीची अंमलबाजवणी सुरु असून येत्या 18 ऑक्‍टोबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता. 16) जालना येथे केली. 

औरंगाबाद ः राज्यातील शेतकऱ्यांना जाहीर झालेल्या कर्जमाफीची अंमलबाजवणी सुरु असून येत्या 18 ऑक्‍टोबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता. 16) जालना येथे केली. 

कडवंची येथील सिमेंट नाला बंधाऱ्याची पाहणी व जलपूजनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. सरकारी योजना यशस्वी होण्यासाठी त्यात लोकसहभाग महत्वाचा असतो. लोकसहभागातून गावांचा कसा कायापालट होतो याचे कडवंची हे उदाहरण आहे. या गावाचा आदर्श घेऊन इतरांनी देखील आपल्या गावात जलसंधारणाची कामे करावीत शासन त्याला पुर्ण मदत करेल असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी उपस्थित ग्रामस्थ व शेतकऱ्यांना दिले. 

शाश्‍वत शेतीच्या अभावामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे विकेंद्रीत पाणीसाठे निर्माण करण्याची आवश्‍यकता आहे. त्यातून शेतकरी निश्‍चितच समृध्द होईल असा विश्‍वास फडणवीस यांनी व्यक्त केला. 

शेतकऱ्यांच्या पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शेतीक्षेत्रात यापूर्वी गुंतवणूक होत नव्हती परंतु राज्य शासनाने 25 हजार कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक वाढवली आहे. देशातील द्राक्षे व डाळींबाला परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्ग तसेच ड्रायपोर्ट प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

 

संबंधित लेख