farmer loan ajit nawale news | Sarkarnama

उर्वरित 33 लाख थकित कर्जदार शेतकरी कोठे गायब झाले : नवले 

सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

मुंबई : राज्यात थकित कर्जदार असलेल्या 89 लाख शेतकाऱ्यांपैकी केवळ 56 लाख 58 हजार शेतकरी कुटूंबाचे अर्ज प्राप्त झाल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. या आकडेवारीनुसार उर्वरित 33 लाख शेतकरी कोठे गायब झाले असा सवाल शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी केला आहे. 

मुंबई : राज्यात थकित कर्जदार असलेल्या 89 लाख शेतकाऱ्यांपैकी केवळ 56 लाख 58 हजार शेतकरी कुटूंबाचे अर्ज प्राप्त झाल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. या आकडेवारीनुसार उर्वरित 33 लाख शेतकरी कोठे गायब झाले असा सवाल शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी केला आहे. 

डॉ. नवले म्हणाले, "" राज्यातील 98 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार असल्याने, राज्य सरकारने केलेली कर्जमाफी ही 'ऐतिहासिक कर्जमाफी' असल्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस सांगत होते.आपली '98 लाख' ही आकडेवारी बॅंकांनी दिलेल्या माहितीवर आधारित असल्याने बिनचूक असल्याचा दावा ते करत होते. प्रत्यक्षात मात्र 1 कोटी 4 लाख शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी नोंदणी केली. अर्ज मात्र फक्त 58 लाखाच दाखल झाले आहेत. समोर आलेले हे आकडे फडणवीस सरकारच्या 

देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात 89 लाख शेतकरी कर्जदार असल्याचे वारंवार सांगितले आहे. राज्यातील या सर्व 89 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे ते वारंवार सांगत होते. केवळ प्रसारमाध्यमांनाच नव्हे तर सभागृहातही त्यांनी हीच आकडेवारी सांगितली आहे. अशा परिस्थितीत आता केवळ 58 लाखच शेतकऱ्यांचे अर्ज कर्जमाफीसाठी प्राप्त झाल्याने देवेंद्र फडणवीसांनी सभागृहाची व राज्यातील तमाम जनतेची फसवणूक केली आहे. राज्यातील जनता फडणवीस सरकारला या ऐतिहासिक फसवणुकीसाठी कदापी माफ करणार असेही ते म्हणाले. 

उद्या (26 सप्टेंबर) जळगाव येथे सुकाणू समितीची राज्यव्यापी शेतकरी कर्जमुक्ती व रास्त भाव हक्क परिषद होत आहे. राज्य सरकारच्या या फसवणुकीची रास्त दखल ही परिषद घेईल व राज्य सरकारच्या या फसवणुकी विरोधात पुन्हा एकदा शेतकरी लढा उभारतील असे त्यांनी शेवटी सांगितले.  
 

संबंधित लेख