डॉ. आशीष देशमुखांच्या आंदोलन मंडपामागेच शेतकऱ्याची आत्महत्या

काटोल येथे भाजपचे आमदार डॉ. आशीष देशमुख यांच्या ठिय्या आंदोलनाच्या मंडपामागेच एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे. दिलीप लोहे असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
डॉ. आशीष देशमुखांच्या  आंदोलन मंडपामागेच  शेतकऱ्याची आत्महत्या

नागपूर : काटोल येथे  भाजपचे आमदार डॉ. आशीष देशमुख यांच्या ठिय्या आंदोलनाच्या मंडपामागेच एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे. दिलीप लोहे असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या गारपिटीनंतर शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, तसेच बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांच्या यादीत काटोल व नरखेड तालुक्‍याचा समावेश व्हावा, यामागणीसाठी आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी काटोल येथे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांसाठी  उभारण्यात आलेल्या मंडपामागे एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. 

दिलीप लोहे हा काटोल येथे ऑटो चालवित होता. तसेच भाडेपट्टीवर शेती घेऊन शेतीही करीत होता. गेल्या आठवड्यात झालेल्या गारपिटीमुळे त्याच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यामुळेच दिलीप लोहे या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

दिलीप लोहे यांच्या आत्महत्येमुळे आमदार आशीष देशमुख यांनाही धक्का बसला. हा शेतकरी दुसऱ्यांची शेती भाडेपट्टीवर करीत असल्याने या नुकसानीबद्दल त्याला नुकसान भरपाई मिळण्याची शक्‍यता नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com