Fake facebook account in the name of Girish Bapat | Sarkarnama

गिरीश बापट यांच्या नावाने  बनावट फेसबुक प्रोफाइल 

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 21 जुलै 2017

पुणे : पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नावाने बनावट फेसबुक प्रोफाइल तयार करून महिलांची आक्षेपार्ह छायाचित्रे टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर गुन्हे शाखेने ऋतुराज सावकार नलावडे (वय 30, रा. धोलवड, ता. जुन्नर, जि. पुणे) याला अटक केली आहे. शेती आणि पत्रकारितेचा त्याचा व्यवसाय आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुक या सोशल मिडियावर "नामदार गिरीश बापट' या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करण्यात आले. त्यावर बापट यांचे छायाचित्र वापरण्यात आले होते. तसेच या फेसबुक प्रोफाइलवर काही महिलांची आक्षेपार्ह छायाचित्रेही टाकल्याचे आढळून आले होते. याप्रकरणी बापट यांचे माध्यम सल्लागार यांनी सायबर गुन्हे शाखेत दिलेल्या तक्रारीवरून बंडगार्डन पोलिस ठाण्यात माहिती व तंत्रज्ञान कायद्यातील कलम 66 (सी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान, तांत्रिक माहितीच्या आधारे हे बनावट अकाउंट ऋतुराज नलावडे याने तयार केल्याचे आढळून आले. त्याने याशिवाय काही बनावट फेसबुक प्रोफाइल तयार केल्याचे तपासात समोर आले आहे. पुढील तपास सायबर गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक राधिका फडके करीत आहेत. 

संबंधित लेख