fadnavis low your volume of speech | Sarkarnama

`फडणवीसांना म्हणावं, भाषणातील आवाज जरा कमी करा...`

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 9 सप्टेंबर 2018

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आक्रमक भाषणे करतात, हे आता सर्वांनाच माहीत आहे. विधिमंडळातही भाषण करताना त्यांचा सूर टिपेला पोचलेला असतो. त्यामुळे ते उच्च पदावर असतानाही आक्रास्तळेपणे बोलतात की काय, असा अनेकांचा समज होतो. असा समज खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही झाला होता. बाळासाहेबांनी फडणीसांना भाषणात आवाज कमी करण्याचा सल्ला दिला होता, असेही आता खुद्द उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

फडणवीस व उद्धव ठाकरे हे एका चॅनेलच्या कार्यक्रमानिमित्त एका व्यासपीठावर आले होते. ठाकरे आणि फडणवीस या दोघांतील संबंधांबद्दल या वेळी विचारणा झाली. दोघांनीही आपले संबंध मैत्रीचे, सौहार्दाचे असतात, असे आवर्जून सांगितले. एवढेच नाही तर उद्धवजी हे माझ्या मागे किंवा जाहीर सभेत माझ्याबद्दल एकही वावगी टिप्पणी अथवा टीका करत नाहीत, हे फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले. आमच्या राजकीय भूमिका काही असल्या तरी वैयक्तिक संबंधात त्यात अडथळा नसल्याचे दोघांनीही मान्य केले.

बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयीची आठवण फडवणीस हे सांगत असतानाच ती आठवण उद्धवजींनी पूर्ण केली. फडणवीस हे मुख्यमंत्री होण्यापूर्वी भाजपची बाजू मांडण्यासाठी विविध चॅनेलवर जात होते. बाळासाहेब एका चॅनेलवर फडणवीस यांचा सहभाग असलेली चर्चा ऐकत होते. फडणवीस यांनी मांडलेले मुद्दे त्यांना आवडले. त्यांनी उद्धव यांनी विचारले की हा कोण बोलत आहे? त्यावर उद्धव यांनी ते फडणवीस असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना फोन लावू का, अशी विचारणा उद्धव यांनी बाळासाहेबांकडे केली. बाळासाहेबांनी तेव्हा फडणवीस यांचे चर्चेत प्रभावी मुद्दे मांडल्याबद्दल कौतुक केले. पण तुमचा भाषणाताली आरडाओरडा कमी करा, असा सल्ला त्यांना दिल्याचे उद्धव यांनी सांगितले.

फडणवीस यांनी आपले वकील होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले असल्याबद्दल या चर्चेत खंत व्यक्त केली. तर उद्धव यांनी आपला पिंड कलाकाराचा असल्याने वेळ मिळेल तेव्हा छायाचित्रण करतो, हे सांगितले.

संबंधित लेख