fadanvice thckray meeting again | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरेंमध्ये पुन्हा बंद दाराआड चर्चा 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018

मुंबई ः शिवसेनेच्या "एकला चलो रे'च्या नाऱ्यामुळे युतीत निर्माण झालेल्या तणावानंतर सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सोमवारी 15 मिनिटे झालेल्या चर्चेमुळे सर्वांच्या भुवाय उंचावल्या. 

नांदेडच्या गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीच्या प्रशासकीय कार्यालयाचे नरिमन पॉइंट येथे उद्‌घाटन झाले. त्यानिमित्त फडणवीस-उद्धव एकत्र आले होते. 
उद्‌घाटन कार्यक्रमानंतर दोन्ही नेत्यांनी एकत्र अल्पोपाहार घेतला. या वेळी बंद दाराआड त्यांच्यात 15 मिनिटे चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. फडणवीस-ठाकरे यांची आठवड्याभरातील ही दुसरी भेट असल्याने यासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्यातील चर्चेचा तपशील मात्र गुलदस्त्यात आहे. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनी महापौर बंगल्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये 20 मिनिटे चर्चा झाली होती. सध्या अधिवेशन सुरू असल्याने शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतल्यास भाजपला त्रासदायक ठरू शकते. शिवसेनेच्या आमदारांवर अंकुश ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची ही खेळी तर नाही ना, असे प्रश्‍नही उपस्थित होऊ लागले आहेत. 
 
संबंधित लेख