fadanvice government loss maharastra mutemwar | Sarkarnama

फडणवीस सरकारने राज्याचा सत्यानाश केला : मुत्तेमवार 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

नागपूर ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात राज्य सरकारवर कर्जाचा बोजा 6 लाख कोटी रुपयांवर गेला असून हे सरकार जितका काळ सत्तेवर राहील, तेवढा राज्याचा सत्यानाश होईल, अशा शब्दात माजी केंद्रीय मंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांनी हल्ला चढविला. 

नागपूर ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात राज्य सरकारवर कर्जाचा बोजा 6 लाख कोटी रुपयांवर गेला असून हे सरकार जितका काळ सत्तेवर राहील, तेवढा राज्याचा सत्यानाश होईल, अशा शब्दात माजी केंद्रीय मंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांनी हल्ला चढविला. 

फडणवीस सरकारला चार वर्षे झाल्यानिमित्ताने "सरकारनामा'शी बोलताना मुत्तेमवार म्हणाले, की दुरून डोंगर साजरे दिसते, याचा अनुभव आता राज्यातील जनतेला येत आहे. विरोधी पक्षात असताना राज्य सुजलाम सुफलाम करू, प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर आमच्याकडे आहे, असे असा दावे करणारे लोक सत्तेत आल्यानंतर जनतेचे काहीही भले करू न शकल्याने जनतेचा पुरता अपेक्षाभंग झाला आहे. समाजातील एकही घटक आज समाधानी नाही. 

कॉंग्रेस सरकारच्या योजनांवर उधारीवर सध्याचे सत्ताधारी "गमजा' मारत आहे. नागपुरातील मेट्रो रेल्वे, मिहान, सिमेंट रस्ते हे कॉंग्रेस सरकारची देण आहे. मेट्रोचा डीपीआर डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात पूर्ण झाला होता. नागपुरात मिहान आणण्याचे काम माझ्या नेतृत्वात कॉंग्रेसच्या कार्यकाळात झाले होते. कॉंग्रेसच्या या योजनांचे श्रेय घेण्याचे काम सध्या फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी घेत आहे असे ते म्हणाले. 

या सरकारच्या योजनांचा अनुभव लोकांना येत आहे. या सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफीची योजना आणली. या कर्जमाफी योजनेचे कसे तीनतेरा वाजले, हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आहे. या सरकारने नागपूरच्या नागनदीत जहाज चालविणार, अशी घोषणा केली होती. नागनदीत जहाज जाऊ द्या, पाणी सुद्धा आणू शकले नाही. केवळ घोषणा करणे, खोटे बोलणे हा एककलमी कार्यक्रम फडणवीस सरकारचा आहे, अशी टीकाही शेवटी त्यांनी केली.  

 

संबंधित लेख