fadanvice and amit shah discuss in delhi | Sarkarnama

मंत्रिमंडळ विस्तारावर फडणवीस-शहांची दिल्लीत चर्चा ? 

सकाळ न्यूज नेटवर्क 
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

मुंबई : भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. या दोन नेत्यांमध्ये मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा झाल्याचे समजते. 

मुंबई : भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. या दोन नेत्यांमध्ये मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा झाल्याचे समजते. 

दसऱ्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत होती. मात्र शिवसेनेकडून विस्ताराला दुजोरा मिळाला नसल्याने विस्ताराचा मुहूर्त अद्याप निश्‍चित झाला नाही. फडणवीस आज बुलडाणा दौऱ्यावर होते. दौऱ्यांनतर ते तातडीने दिल्लीला रवाना झाले. दिल्लीतील लीला हॉटेलमध्ये त्यांची अमित शहांबरोबर महत्त्वपूर्ण बैठक होऊन राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा झाल्याचे समजते. 

आगामी लोकसभा निवडणुकीत नाराज शिवसेनेला जवळ करण्यासाठी शिवसेनेला अधिक महत्त्वाची खाती दिली जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. मंत्रिमंडळाच्या फेरबदलासाठी या बैठकीत चर्चा होऊन यादी निश्‍चित केली जाऊ शकते.या बैठकीतच मंत्रिमंडळ विस्तारासाठी शहा यांनी मुख्यमंत्र्यांना हिरवा कंदिल दाखल्याची चर्चा आहे. दसऱ्यानंतर राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल केले जातील असे सूत्रांकडून समजते. 

 

संबंधित लेख