Fadanis challenges Rahul Gandhi on farmer's loan waiver | Sarkarnama

पाच हजार कोटी देतो, कर्जमाफी करून दाखवा  - फडणवीसांचा राहुल गांधींवर पलटवार 

सरकानामा ब्युरो
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

मुंबई :  "आमच्या सरकारने जर 5 हजार कोटी रूपयांचीच कर्जमाफी दिली असे जर राहुल गांधी म्हणत असतील तर मी त्यांना 5 हजार कोटी रूपये देतो, त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करून दाखवावी," असे आव्हान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना दिले.

राहुल गांधी यांनी नांदेडमध्ये झालेल्या एका सभेत राज्य सरकारने 35 हजार कोटींची नव्हे तर 5 हजार कोटींचीच कर्जमाफी दिली असल्याची टीका केली होती, त्या टिकेचा समाचार घेत मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांना आव्हान दिले.

राज्यात मागील पंधरा वर्षांत तुमचीच सत्ता होती, तुम्ही जर शेतकऱ्यांसाठी चांगले काम केले असते तर आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या नसल्या, हे त्यांचेच फळ असल्याचा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावत राहुल गांधीवर पलटवार  केला. 

यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपण राज्यातील शेतकऱ्यांना आपण आत्तापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी देत असल्याचा दावाही करत राहुल गांधी कर्जमाफीच्या प्रश्‍नावर खोटे बोलत असल्याचेही म्हणाले.

संबंधित लेख