आम्ही कमी बोलतो आणि काम अधिक करतो : मुख्यमंत्र्यांची काॅंग्रेसवर टीका

आम्ही कमी बोलतो आणि काम अधिक करतो : मुख्यमंत्र्यांची काॅंग्रेसवर टीका

नागपूर : आम्ही कमी बोलतो आणि काम अधिक करतो, ही आमची काम करण्याची शैली आहे. यापूर्वी फक्त गप्पा व्हायच्या आणि काम अजिबात होत नसे, ती त्यांची काम करण्याची पद्धत होती. विकासाची फळं जनतेला मिळू द्यायची नाही आणि केवळ नाऱ्यांवर त्यांना वाट पाहायला लावायची, हाच कित्ता गिरवला गेला. ही परिस्थिती आम्ही बदलली, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला आज नागपूर येथे उपस्थित राहून संबोधित केले. यावेळी व्ही. सतीशजी, दुष्यन्त गौतमजी, कृष्णा राज जी, माझे मंत्रिमंडळातील सहकारी श्री राजकुमार बडोलेजी, दिलीप कांबळेजी हे उपस्थित प्रामुख्याने उपस्थित होते.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेले इंग्लडमधील घर सरकारतर्फे विकत घेतल्याची कामगिरी केल्याबद्दल या वेळी फडणवीस यांच्या अभिनंदनाचा या वेळी ठराव करण्यात आला.

मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार गरीबांच्या आणि मागास राहिलेल्या घटकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवून खऱ्या अर्थाने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या मुलभूत मूल्यांतून जे स्वप्न पाहिले, त्याच्या पूर्ततेसाठी संघर्ष करीत आहे. काँग्रेस पक्षाला माझा प्रश्न आहे की, स्वातंत्र्यप्राप्तीच्या 70 वर्षांनंतर सुद्धा स्वतःचे घर, वीज, स्वयंपाकाचा गॅस इतक्या साध्या आणि मूलभूत सुविधांपासून नागरिक का वंचित आहेत, असा सवाल त्यांनी विचारला.

प्रधानमंत्री आवास योजना, उज्वला, उजाला यासारख्या योजनांच्या माध्यमातून मोदी यांनी केवळ उद्दिष्ट निर्धारित केले नाही तर, आज अनेक गरीब आणि मागास घटक त्यातून लाभान्वित झाले आहेत. आमचे महान नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे स्वप्न खऱ्या अर्थाने आता पूर्ण केले जाते आहे आणि वास्तविकता लक्षात आल्यानंतर काँग्रेस खोटे बोलण्यात आणि लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु संविधानाचे खरे पालनकर्ते कोण आणि कुणी त्याचा व्होटबँक म्हणून वापर केला, हे आता सर्वांना ठाऊक झाले आहे, अशी टीका त्यांनी काॅंग्रेसवर केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com